आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल मुदतीत देण्यात ‘सोलापूर’ राज्यात अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील वर्षी परीक्षांचे निकाल मुदतीत देण्याचा विक्रम सोलापूर विद्यापीठाने केला आहे. काही निकाल तर मुदतीपेक्षा कमी दिवसांत जाहीर केले आहेत. याची दखल घेत कुलपती सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाचे कौतुक बैठकीत केले.

विद्यापीठांचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आणि महाविद्यालये विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक यांची बैठक झाली. सोलापूर विद्यापीठाचे सर्व निकाल ४५ दिवसांच्या मुदतीत लागले आहेत. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल ३० दिवसांच्या आत लावले.

बैठकीत विद्यापीठांच्या प्रगतीचा, कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राजेश अग्रवाल समितीने परीक्षाविषयक सुधारणा सुचविल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. सर्व विद्यापीठांनी मार्च, एप्रिल २०१५ मधील परीक्षांच्या निकालांचे तपशील सादर केले. सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या एकूण ५१२ परीक्षा झाल्या. त्याचे यशस्वी नियोजन केले होते. त्यातील ४६३ म्हणजे ९०.४२ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत तर उर्वरित सर्व ४९ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावले.

जळगावही उत्तम
सुमारे दीडशे वर्षे जुने असलेल्या मुंबई विद्यापीठाने ३६४पैकी २०३ निकाल ४५ दिवसांनंतर लावले. तर जळगाव विद्यापीठानेही ८७० पैकी ६३६ निकाल ३० दिवसांत लावले आणि उर्वरित २३४ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावले.
बातम्या आणखी आहेत...