आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येय जागतिक आव्हाने पेलणारे विद्यार्थी घडवण्याचे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एका जिल्ह्यापुरते स्थापले गेलेल्या विद्यापीठाने दहा वर्षांची वाटचाल समर्थपणे पेलत आता अकराव्या वर्षांत पाऊल टाकले आहे. गत दहा वर्षांत विद्यापीठाने साध्य केलेली उद्दिष्टे पाहता पुढील आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठ सक्षम बनल्याचे दिसून येईल. म्हणूनच विद्यापीठाचे व्हीजन, मिशन आणि गोल साध्य करण्यासाठी संलग्नित महाविद्यालये, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनाही समवेत घेऊन या बदलाकडे वेगाने वाटचाल करणे आवश्यक आहे. येत्या काळातील हेच आव्हान असेल.

कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी विद्यापीठाचे व्हीजन काय असेल? मिशन आणि गोल काय असेल? याबाबतची स्पष्टता वेळोवेळी केली आहे. बदलत्या जगात व्यावसायिक जीवन शिक्षणप्रणालीचे महत्त्व वाढत आहे. हे आव्हान पेलणारे विद्यार्थी ववििध क्षेत्रात नवे नेतृत्व निर्माण करतील. त्या दृष्टीने सोलापूर विद्यापीठ आपल्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून गुणवत्ता प्रधान शिक्षण प्रणाली अंगिकारेल. त्याचबरोबर समाजातील आर्थिक आव्हान आणि वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचले पाहिजे, यासाठी विशेषत्वाने प्रयत्नही करेल. यासाठी संसाधने आणि पायाभूत सुविधांचा वापर वाढला पाहिजे, हेही गोल आहे.

व्हीजन
विद्यापीठविद्यार्थी केंद्रस्थानी असेल, उच्च गुणवत्ता राखणारी शिक्षणपद्धती, संशोधनात्मक ज्ञानकेंद्र बनावे , त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीही असली पाहिजे, असे व्हीजन सोलापूर विद्यापीठाने बाळगले आहे. नजीकच्या काही वर्षात हे साध्य होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावलेही टाकली आहेत.

मिशन
सोलापूरविद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात उच्च दर्जाचे अभ्यासक्रम असतील. अध्यापन पद्धती अभिनव असेल. सुस्पष्ट संयोजनाच्या माध्यमातून गुणवत्ता बाळगलेला विद्यार्थी निर्माण करण्याची जबाबदारीही असेल. असे विद्यार्थी जागतिक बदलाला तोंड देणारे, जागतिक आव्हाने स्वीकारणारे असतील.

विद्यापीठाची आश्वासक पावले
पाचसंकुले आणि १९ पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि ३२ व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू असणाऱ्या विद्यापीठाने डिजिटल युनवि्हर्सिटीची २००६ पासूनची ओळख जपली आहे. गेल्या काही वर्षातच ववििध संशोधनपर प्रकल्पासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांना तब्बल १४३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. गुणवत्ता संशोधन या दोन कसोट्यांवर सोलापूर विद्यापीठ आश्वासक पावले टाकत आहे. नावाजलेल्या विद्यापीठांसमोर केवळ अकरा वर्षे वयाचे हे विद्यापीठ आपली गुणवत्ता दाखवत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...