आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी स्मार्ट होतेय, पण सोलापूर युनिव्हर्सिटी कधी होणार स्मार्ट?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर स्मार्ट होत आहे. त्यातील अनेक विभागांनी कात टाकून आपल्या कार्यशैलीत सुधारणा केली आहे. काही विभाग स्मार्ट होत आहेत. परंतु विद्यापीठ स्मार्ट बनते आहे काय, या प्रश्नावर अनेक विद्यार्थी असमाधानी असल्याचे दिसून येत आहेत. वसतिगृह, ग्रंथालय, वाहनतळ आदी विभागात अनेक समस्या असल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली आहे.
२००४मध्ये सोलापूर विद्यापीठ स्थापन झाले. एक तप लोटले तरी म्हणावा तसा स्मार्ट बदल दिसून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्व आलबेल आहे असेही नाही. कर्मचाऱ्यांमध्ये विद्यापीठाच्या प्रतिमेबाबत आस्था नाही आणि विद्यार्थीकेंद्रित विद्यापीठ असे बिरूद मिरवणाऱ्या विद्यापीठात अजूनही अनेक समस्या आहेत. विद्यापीठाला १२ प्राप्त झाले, नॅक मूल्यांकन झाले, स्मार्ट क्लासेस कार्यान्वित झाले. असे असले तरी वायफाय कॅम्पस, विविध विभागाची गुणवत्ता आणखी वाढणे गरजेचे आहे.

पाच प्रशस्त संकुल, २० ते २१ विभाग असा डोलारा आहे. यात संकुलनिहाय समस्या आहेत. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. संकुलात नव्याने थंड पाण्याच्या सोयीसाठी कुलर बसवण्यात आले आहेत. पण वसतिगृहात विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही. मुलांना पाण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत यावे लागते.

आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत
डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रंथालयात मुबलक पुस्तके आहेत. भविष्यात ७५ लाख रुपयांची पुस्तके, ४५ लाखांची नियतकालिके, बुक्स खरेदी करीत आहोत. ज्या विभागाला पुस्तके हवी आहेत, त्यांनी त्या पुस्तकांची यादी ग्रंथालयात द्यावी. नुकतेच वसतिगृहांसाठी लाख ८५ हजार रुपयांची पाइप लाइन कुलर घेतले आहेत. शिवाय, प्रत्येक संकुलातील आठ असे एकूण ४० जणांना अडीच हजार रुपयांची पुस्तके कायमस्वरूपी देत आहोत. दोन खानावळी असून जेवणाच्या दर्जाबाबत मला खात्री आहे. तरीही त्यांना सांगू.
विद्यार्थ्यांना काही समस्या असतील तर वसतिगृह आणि मुख्य इमारतीत तक्रार पुस्तकात विद्यार्थ्यांनी स्वत:चे नाव इयत्तेसह नोंद करण्याची सोय आहे. यात अनेकदा नोंद केली तरी त्या शंका समस्यांचे निरसन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. फॅन फिरणे, ट्युबलाइटस् बंद असणे, अंघोळीसाठी गरम पाणी नसणे, वर्गात अस्वच्छता आदी समस्या तक्रार पुस्तकात नोंद आहेत. पण त्या वेळीच सुधारण्यात येत नाहीत.

तक्रार पुस्तकात अनेक नोंदी
सोलापूर विद्यापीठात विविध विभाग असून, पदव्युत्तर पदवी विभागातील विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध नाहीत. ग्रंथालयात ३६ हजार ७५८ पुस्तके असल्याचा फलक ग्रंथालयात ठळकपणे लावण्यात आला आहे. परंतु संबंधित विभागाच्या विद्यार्थ्याला पुस्तक हवे असेल तर किमान अर्धा तास ग्रंथालयात घालवावा लागतो. १४ हजार ३१२ बुक टायटल्स, २६ आंतरराष्ट्रीय तर ९० राष्ट्रीय जर्नल्स आहेत. हजार ५४ बाऊंड व्हॉल्युम्स जर्नल्स, हजार ८५५ दान दिलेली पुस्तके आहेत. हजार ३५५ शोधनिबंध आहेत. याची नोंद ग्रंथालयात आहे. परंतु ठरावीक पुस्तक हवे असेल तर किमान अर्धा तास घालावा लागतो. विशेष म्हणजे हा विभाग सांभाळायला तीन वरिष्ठ अधिकारी आणि तीन कनिष्ठ कर्मचारीही आहेत. त्यांची भाषाही व्यवस्थित नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

जेवणावरून होतात रोज वाद
विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन मेस आहेत. परंतु दोन्हीही खानावळीत योग्य आहार मिळत नाही असे विद्यार्थी सांगतात. सकाळच्या जेवणातील काही पदार्थ संध्याकाळच्या जेवणात तर संध्याकाळचे पदार्थ सकाळच्या जेवणात असे प्रकार असतात. पोटभर जेवण अशी सुविधा असली तरी चपातीमध्ये सोड्याचा वापर, भाज्यांमध्ये मिरचीचा मारा अशा अनेक गोष्टी विद्यार्थी सांगतात.

वाहने सुरक्षित नाहीत : विद्यार्थ्यांचीवाहने पाहण्यासाठी सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे पेट्रोल चोरी होणे, चाकातील हवा सोडणे, गाड्यांना स्क्रॅचेस पडणे असे प्रकार होत आहेत.

अजून कशाचाच पत्ता नाही
सूरजशिंदे, विद्यार्थी
सोलापूर विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभागाची अजून पुस्तके उपलब्ध नाहीत. आज दीड महिना होऊन गेला तरी ओळखपत्रही अजून मिळालेले नाही. एखादे पुस्तक घेताना आणि रजिस्ट्रेशन करायलाच खूप वेळ जातो. आवश्यक असणारी पुस्तके खूप कमी आहेत.

जेवणही शिळे असते...
विश्वनाथचडचणे, विद्यार्थी

जेवणात कधी मीठ जास्त असते, तर कधी मिरची. चपातीत सोडा घातल्याने पोटभर जेवण होत नाही. सकाळचे पदार्थ संध्याकाळच्या जेवणात तर रात्रीचे पदार्थ कधीकधी सकाळी वाढण्यात येतात. तक्रार करण्यास गेलो तर रेक्टर आम्हालाच रागावतात. कृपया लक्ष द्यावे.

यालाविद्यापीठ म्हणावे का?
आनंदलोखंडे, विद्यार्थी
नावाला विद्यापीठ डिजिटल झाले असे आहे. किमान सुविधा,स्वच्छता सोयी देण्यात विद्यापीठ कमी पडत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कक्षात डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची बोलण्याची भाषा बरोबर नाही. उद्धट बोलतात, पुस्तकांची ही वानवा आहे. विद्यापीठात सुविधा सोयी मिळाव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी रास्तच आहे.
ग्रंथालयात पुस्तकांचा तुटवडा
कर्मचाऱ्यांमध्ये विद्यापीठाच्या प्रतिमेबाबत आस्था नाही, अजूनही अनेक समस्या आहेत
संबंधित विभागाच्या विद्यार्थ्याला पुस्तक हवे असेल तर किमान अर्धा तास वाट पाहावी लागते
वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची घेतली जात नाही योग्य काळजी, पाण्यासाठी मुख्य इमारतीत यावे लागते
बातम्या आणखी आहेत...