आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्युत गोडबोले यांना सोलापूर विद्यापीठाचा ‘जीवनगौरव’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठातर्फे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांना "जीवनगौरव'ने सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त ऑगस्टला होणाऱ्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, गौरवचिन्ह असे आहे. निवड समितीने एकमताने ही निवड केली. विद्यापीठाचा अकरावा वर्धापन दिन असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही यंदापासून सुरू करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. शहर आणि ग्रामीण अशा दोन विभागांत हे पुरस्कार दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी कुलसचिव शिवशरण माळी, बीसीयूडी संचालक प्राचार्य आर. वाय. पाटील, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, वित्त लेखा अधिकारी सतीश नारकर, नॅक समन्वयक प्रा. पी. प्रभाकर, डॉ. ए. ए. घनवट, डॉ. रवींद्र चिंचोलकर, सहायक कुलसचिव मलिक रोकडे आदी उपस्थित होते.

"नॅक'ची तयारी
सोलापूरविद्यापीठास "नॅक'समिती ते १२ सप्टेंबर दरम्यान भेट देणार आहे. अध्यक्ष प्रो. एस. ए. बरी, सदस्य ओखीलकुमार मेधी, के. बी. बुधोरी, प्रो. ओ. पी. सिंग, प्रो. एस. एम. के. कादरी, डॉ. निरंजन वनाली तर समन्वयक डॉ. गणेश हेगडे अशी सात जणांची ही समिती आहे. नॅककडून चांगला दर्जा प्राप्त होऊ शकेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मालदार यांनी व्यक्त केला. यानिमित्त विविध शैक्षणिक प्रशासकीय विभागाने जय्यत तयारी केली आहे.

गोडबोले यांचा परिचय
श्री.गोडबोले मूळचे सोलापूरचे आहेत. ३२ वर्षे माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात योगदान दिले. सध्या ते सॉफ्टेक्सेल कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करीत आहेत. संगणकयुग, बोर्डयम, नादवेद, किमयागार, अर्थात, नॅनोदय, गुलाम, थैमान चंगळवादाचे, गणिती, मनात, स्टीव्ह जॉब्ज, झपुर्झा, मुसाफीर यासह ओएस कॉम्प्युटर, बेव टेक आदी ग्रंथही लिहिले. त्यांना उद्योगररत्न, कुमार गंधर्व, सह्याद्री नवरत्न, आयआयटी पवईचा डिस्टिंग्विश अॅलम्नी, लाभसेठवार, डॉ. पारनेरकर, सोनोपंत दांडेकर, न. चि. केळकर, आदी पुरस्कार मिळालेले आहेत. ८० च्या दशकात त्यांनी अमेरिकेत एक लाख प्रोग्रॅमर पाठवले. मुंबईत गतिमंद मुलांसाठी आशियाना ही शाळा सुरू केली. धुळे भागात आदिवासींसाठी कार्य केले.
बातम्या आणखी आहेत...