आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University: Ph.d Fee, Progress Report On Hold

पीएच.डी.चे शुल्क, प्रगती अहवाल प्रलंबित; तर दरमहा हजाराचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पीएच.डी.चासहा महिन्यांचा अहवाल किंवा वार्षिक फी भरण्याबाबत चालढकल केली तर संशोधन करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भलतेच महागात पडणार आहे. सहामाही प्रगती अहवाल दिला नाही तर प्रत्येक सत्राला एक हजार रुपये दंड तर पीएच.डी. शुल्क वेळेत भरले नाही एक महिना उशीर झाला तर ५०० रुपये दंड. दोन महिने उशीर झाला तर ७०० रुपये दंड, तीन महिने उशीर झाला तर एक हजार रुपये दंड आणि त्या पुढील प्रत्येक महिन्यात एक हजार रुपये दंड दरमहा लागू केला.

संशोधन केंद्राने जमा शुल्क मुदतीच भरले गेले तर संशोधन केंद्रासही असा दंड भरावा लागेल. याबाबत डिसेंबर रोजी विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे. परिपत्रकात या बदलाची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून करण्यात येईल, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात सध्याच्या मागील विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असल्याची विद्यापीठाने भूमिका घेतली आहे. दरम्यान, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे प्रा. सतीश राजमाने यांनी विद्यापीठाला यासंदर्भात निवेदन देऊन दंड आकारणी कमी करण्याची मागणी केली.
अनुचित, अनैसर्गिक
परिपत्रक अत्यंत चुकीचे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. मूळ रक्कम १७८ रुपये आणि दंड प्रति महिना हजार रुपये अशी आकारणी अनैसर्गिक ठरेल. २०१५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होत नाही. प्रत्येक वर्षासाठी १००० रुपये करा. प्रा.सतीश राजमाने, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघ
वेळेत सादर नाही
कोल्हापूर विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वीच याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सोलापूर विद्यापीठ आतापर्यंत इतके दंड आकारत नव्हते. मात्र विद्यार्थी प्रगती अहवाल वेळेत देत नाहीत. शुल्क भरत नाहीत. दंड सर्वच विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. तसा परिपत्रकात तसा उल्लेख करू. प्रा.आर.एस. पाटील, संचालक, बीसीयूडी