आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी कुलसचिव सोनजे अपात्र, ३७ लाख वेतन रिकव्हरी होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- साेलापूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे पदासाठी अपात्र ठरल्याने त्यांना दिले गेलेले वेतनही अमान्य झाले आहे. परिणामी वेतनापोटी दिले गेलेल्या तब्बल ३७ लाख रुपयांचे वेतन रिकव्हरी करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, रिकव्हरी करण्यापूर्वी नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच अंतिम आदेश देण्यापूर्वी या प्रकरणी डॉ. सोनजे यांची बाजूही एेकण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून झाला आहे, अशी माहिती शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे यांनी दिली.
कॅ. सोनजे हे नोव्हेंबर २००९ मध्ये सोलापूर विद्यापीठात कुलसचिव म्हणून रूजू झाले होते. त्यांनी साडेतीन वर्षे कार्य पाहिले एप्रिल २०१३ मध्ये त्यांनी विविध गैरप्रकारांच्या आरोपांनी बेजार होत राजीनामा देणे पसंत केले होते. कुलसचिव पदासाठी पाच वर्षांचा अनुभव नसतानाही त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. ती शासनमान्यही झाली होती,त्यानंतर वेतन निर्धारण समितीने त्यांना अपात्र ठरविले. यामुळे नियुक्त करणारे तत्कालीन कुलगुरू, पात्रता समिती सदस्य हेच खरे या प्रकरणी जबाबदार धरले पाहिजे. आता विद्यापीठ फंडातून हे ३७ लाख रुपयांची रिकव्हरी होण्याची वेळ आली आहे. मूळात सोनजे अपात्र असतानाही त्यांची नियुक्ती झाली होती,हेे प्रकरण विद्यापीठात बरेच गाजले होते.
कशी होणार रिकव्हरी : सोनजे यांची नियुक्ती अपात्र ठरल्याचा अहवाल वेतन निर्धारण समितीने दिला आहे. तो उच्च शिक्षण विभागाने मान्य केल्याने आता नियमानुसार पुढील वेतन रिकव्हरी होईल. मात्र ही रिकव्हरी कोणाकोणावर बसणार हे चौकशी नंतर समोर येईल.
वेतन रिकव्हरी होईल
^नियुक्तीबाबतसविस्तर माहिती मागविण्यात येईल. कॅ. सोनजे यांची बाजूही विचारात घेतली जाणार आहे. वेतन रिकव्हरीबाबतची जबाबदारी याचा एकत्रित अहवाल तयार होईल. डॉ.सतीश देशपांडे, उच्च शिक्षण सहसंचालक
माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांना मर्जीतील व्यक्ती कुलसचिवपदी असावी या हेतूने कोल्हापूर विद्यापीठात तेव्हा उपकुलसचिवपदी कार्यरत असलेले डॉ. सोनजे यांची नियुक्ती केली. स्क्रुटिनी समितीनेही मान्यता दिली होती. त्या पुढे जाऊन नियुक्तीला शिक्षण संचालक कार्यालयानेही मान्यता दिली होती. मात्र वेतन निर्धारण समितीने अनुभव कमी असल्याच्या कारणावरून अपात्र ठरविले, हा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाने मान्य केला असल्याने आता वेतन रिकव्हरीचा निर्णय घेण्यात आहे. आता विद्यापीठ, नियुक्त करणारी स्क्रुटिनी समिती सर्वच जण चौकशीच्या फेऱ्यात असतील.
नोटीस मिळाली नाही
^नियुक्तीअपात्र,वेतन रिकव्हरी याबाबत मला काहीच माहीत नाही. कोणतीही सूचना, नोटीस मिळालेली नाही. कॅ.डॉ. नितीन सोनजे, कुलसचिव , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
पाच पैकी तीन कुलसचिवांचा राजीनामा
पहिले शासन नियुक्त : बी. एन. व्हटकर (दोनमहिने कार्यकाळ पूर्ण)
प्रथम: पोपट कुंभार (अडीचवर्षे कार्यकाळानंतर दिला राजीनामा)
द्वितीय: मच्छिंद्र शेजूळ (दीड वर्ष कार्यकाळानंतर िदला राजीनामा )
तृतीय: कॅ. डॉ. नितीन सोनजे (साडेतीन वर्षे कार्यकाळानंतर राजीनामा )
चौथे: अँड. शिवशरण माळी (तीनवर्षे कार्यकाळ : सेवानिवृत्त )
पाचवे: डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा (कार्यरत)
बातम्या आणखी आहेत...