आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नॅक’ मूल्यांकनासाठी सजतेय विद्यापीठही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला सप्टेंबरमध्ये भेट देऊन नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन काैन्सिलची(नॅक) समिती गुणात्मक तपासणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरू विकासकामांमुळे विद्यापीठाचे रूपडेही पालटत आहे. प्रवेशदद्वार आकर्षक सजणार आहे. पायाभूत सुविधांसह दुतर्फा फुलझाडेही लावण्यात येतील. विविध संकुलातही बदल दिसून येत आहेत.
विद्यापीठ प्रशासन जय्यत तयारी करीत आहे. केवळ स्वागत कमानच नाही तर दुभाजक, फुटपाथ, लॅण्ड स्कॅपिंग, रंगकाम, वाहनतळ, रस्ता डांबरीकरण, कम्पाउंड पाण्याची टाकी अशी कोटी ७२ लाखांची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. ती लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी यांनी दिली.
ऑगस्ट अखेर कामे पूर्ण
विद्यापीठात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्यावर सध्या भर आहे. बांधकाम समिती व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रंदिवस कामे सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे आहेत. मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे या दृष्टीने कामे चालू आहेत. ती ऑगस्टआखेर पूर्ण होतील.” डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू