आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय युवा महोत्सव: पश्चिम युवा महोत्सवात विद्यापीठास चार बक्षिसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने पश्चिम युवा महोत्सवात चार बक्षिसे मिळवली. गुजरातच्या मेहसाणा येथील गणपत विद्यापीठात ३२ वा पश्चिम विभागीय युवा महोत्सव झाला. या दोन राज्यांसह मध्यप्रदेश येथील ५९ विद्यापीठांच्या संघांनी सहभाग घेतला. 
 
राष्ट्रीय युवा महोत्सवात चार कलाप्रकारांची निवड प्रथमच झाली. याचा मनोमन आनंद होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाचे विद्यार्थी नक्की यश संपादन करून विद्यापीठाचे नाव यशाच्या शिखरावर घेऊन जातील, असा आशावाद मनात बाळगतो. युवा कलावंताचे मनापासून अभिनंदन.” प्रा.हनुमंत मते, संचालक विद्यार्थी कल्याण, सोलापूर विद्यापीठ 
 
मागील वर्षी राज्यस्तरीय तीन पारितोषिके, पश्चिम विभागीय पाच पारितोषिके, दोन राष्ट्रीय तर आठ आंतरराष्ट्रीय अशा १८ कलाप्रकारांत यश संपादित केले होते. संघव्यवस्थापक म्हणून प्रा. एस. एस. पाटील, प्रा. अानंद साळवे यांनी काम केले.
 
मिळालेली बक्षिसे अशी 
स्थळचित्र : संगमेश्वर बिराजदार (प्रथम), निर्मितीचित्र : संगमेश्वर बिराजदार, प्रदीप भद्रशेट्टी, विक्रांत चौहान, ओंकार साठे, प्रदीप सलगर (प्रथम), एकांकिका : महेश क्षीरसागर, इकरा पीरजादे (मझार, तृतीय), नकला : महेश क्षीरसागर (तृतीय)