आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सव : यंदाही यजमानसाठी शोध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचा १३ वा युवा महोत्सव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जाणार आहे, त्यासाठी इच्छुक महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत, अशी माहिती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. हनुमंत मते यांनी दिली.
गतवर्षापर्यंत महोत्सव आयोजक महाविद्यालयास आयोजनाच्या खर्चापोटी अडीच लाख रुपयांची रक्कम विद्यापीठ देत होते. परंतु वाढता खर्च पाहता यंदा यात मोठी वाढ करण्यात आली असून आयोजन खर्चापोटी यंदा विद्यापीठ लाख रुपयांची रक्कम यजमान महाविद्यालयाला महोत्सव खर्चापोटी देणार आहे.
विद्यापीठ आयोजन खर्चापोटी सहा लाख रुपये देईल. त्याचबरोबर प्रमाणपत्र, प्रावीण्य प्रमाणपत्रे स्मृतिचिन्हे विद्यापीठातर्फे देण्यात येणार आहेत. इच्छुक महाविद्यालयांनी १४ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयांनी वेळेत प्रस्ताव पाठवावेत. यातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन संचालक प्रा. हनुमंत मते यांनी केले आहे.

या आहेत अपेक्षा
या महोत्सवाच्या आयोजनाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयाकडे दोन हजार प्रेक्षक बसू शकतील अशा खुल्या नाट्यगृहाची उभारणी करावी. महाविद्यालयाकडे बंदिस्त नाट्यगृहही असावे. तसेच, एक मध्यम आकाराच्या व्यासपीठाची उभारणी करावी. इतर कला प्रकारांसाठी मोठे हॉल उपलब्ध असावेत. विद्यार्थी कलाकर, संघव्यवस्थापक, परीक्षक अशा सुमारे दोन हजार जणांसाठी चार दिवस भोजनाची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. तसेच १२०० विद्यार्थी, ५०० विद्यार्थिनी, १०० परीक्षक यांची स्वतंत्र निवास व्यवस्था महाविद्यालय परिसरात करणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...