Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur womens criticize on CEO bharud

अाईसारखे म्हणता मग फोटोसेशन करून अवमान का केला? महिलांचा सीईओंना सवाल

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 10:43 AM IST

चिकमहूद (सांगोला)येथे शुक्रवारी गुडमाॅर्निंग पथकाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटोसेशन केल्याप्

 • solapur womens criticize on CEO bharud
  सोलापूर- चिकमहूद (सांगोला)येथे शुक्रवारी गुडमाॅर्निंग पथकाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटोसेशन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सीईअो राजेंद्र भारुड यांना सोमवारी घेराव घालून धारेवर धरले.

  यावेळी बाजू मांडताना भारुड म्हणाले, मी महिलांना हार घातला नाही, अपमानित करण्याचा उद्देश नव्हता, त्या माझ्या अाईसमान अाहेत. संतप्त महिला म्हणाल्या, अाईसमान म्हणता तर त्यांच्या अब्रूचे िधंडवडे का उडवले? फोटोसेशन का केले, फोटोसाठी पोज देण्याएेवजी रोखले कसे नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत भारुडांना कोंडीत पकडले. संवादाएेवजी शाब्दिक चकमक वाढतच गेली. भारुड यांनी महिला पदाधिकाऱ्यांना बाहेर निघा, असे म्हणताच पुन्हा महिलांचा अावाज वाढला. अखेर ते पोलिसांच्या गराड्यात निजी कक्षात निघून गेले. काही पदाधिकारी, खातेप्रमुख, जि.प.सदस्य हा प्रकार निमूटपणे पाहतच राहिले.

  राष्ट्रवादीच्या ३० ते ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन थेट सीईआे भारुड यांना जाब विचारला, यावेळी गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर, कार्याध्यक्ष मनीषा नलावडे, नगरसेविका सुनीता रोटे, जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, रेखा सपाटे यांच्यासह सुनंदा साळुंखे, लता ढेरे, रंजना हजारे, सुवर्ण कांबळे, चारुशीला कुलकर्णी, मार्था असादे , पद्मा गायकवाड, वसिम खान, सुवर्णा यादव, हिरकणी ठोके, भावना कामटे, सुनीता जाधव, सुरेख माशाळ, हमीदा शेख, लक्ष्मी लांडे, विद्या गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती. रविवारी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सीईआेंच्या त्या कारवाईचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झेडपीचे तिन्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांचा बंदोबस्त होता. महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली. पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांच्यासमवेत महिला पोलिस, कमांडो पथक बंदोबस्तासाठी सज्ज होते. दालनामध्ये जाण्यास पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने संघर्ष झाला. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार काही महिलांनी केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी भारूड यांच्याभोवती सुरक्षा कडे केले होते. महिला आंदोलनकर्त्या निवेदन देण्यासाठी आल्या, त्यावेळी सीईआेंच्या दालनामध्ये उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य भारत शिंदे गप्पच होते.

  भारुड सोशल मिडियावर...
  डॉ. भारूड यांनी स्वत: फेसबुक पेजवर त्याप्रकरणाचा खुलासा केला. मी स्वत: फोटो काढल्याचे सिद्ध केल्यास सरकारी नोकरीला लाथ मारून वैद्यकीय व्यवसाय सुरु करेन. मी मागासवर्गीय अदिवासी असून बहुजांनाच्या उत्थानासाठी काम करतो, त्यामुळे अपमानास्पद प्रकार सुरु असल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

  गुडमॉर्निग पथकाने गांधीगिरी करीत ग्रामीण महिलांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी सोमवारी सीईआे डॉ. राजेंद्र भारूड यांच्या समोर संताप व्यक्त केला. आक्रमकता पाहून भारूड स्वत:हून निजीकक्षात निघून गेले.

  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
  सीईओभारूड यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन याबाबत नेमकी काय घटना आहे ? याची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांना अहवाल देणार असल्याचे स्पष्ट केले.
 • solapur womens criticize on CEO bharud

Trending