आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या युवकांचा येतोय शिवाजी महाराजांच्या जीवनावर अल्बम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राची शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जीवनपटांचा वेध घेणारे संगीतमय अल्बम साकारण्याचे काम सोलापूरच्या दोन युवकांनी हाती घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील अल्बमच्या यशानंतर मनोज टोणपे आणि सुरेश संबाळ यांनी हा निर्णय घेतला आहे. याला येणारा मोठा खर्च उचलून याची निर्मिती करण्याचा मानसही या दोघांनी पक्का केला आहे.
महाराजांचा जन्म ते त्यांचे बालपण त्यानंतर त्यांची युद्धकला त्यांचा अभ्यास, त्यांचा विवाह त्यांच्या महत्त्वाच्या स्वाऱ्या आग्रा सुटका, अफझलखान प्रसंग असे अनेक प्रसंग या अल्बममध्ये चित्रित केले जाणार आहेत. याचे गीत लेखन संबाळ आणि टोणपे या दाेघांचेच आहे.
संगीत रावडी राठोडच्या रामनाथ यांचे
दक्षिणात्य चि़त्रपटात रावडी राठोड या चित्रपटाची संगीत बांधणी करणारे राजेश रामनाथ यांच्याकडून हा अल्बम संगीतबद्ध करणार असून या गीताचे गायन अजय-अतुल यांच्याकडून केले जाणार आहे. सध्या संगीत पूर्ण झाले अाहे. लवकरच या अल्बमचे शूटिंग सोलापूर आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात केले जाणार आहे. त्यात सोलापूरच्या जवळपास २०० ते ३०० कलावंतांचा समावेश असणार आहे. यामध्ये मुख्यत्वाने युवा नाट्य कलावंतांना संधी दिली जाणार आहे. छत्रपतींच्या भूमिकेसाठी नवख्या कलावंतांची निवड केली जाणार आहे.

जीवनप्रवास एका गाण्यात अशक्य
^छत्रपतींच्या जीवनाचा प्रवास दाखवणे तसे एका गाण्यात अशक्य आहे. परंतु आम्ही अभ्यास करून याचा प्रयत्न करणार आहोत. दिग्गजांच्या सोबतीने आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. अभ्यास भरपूर करून त्यानुसार शूटिंग करणार आहे. त्यात होलय्या प्रॉडक्शनची सगळी टीमही जोमाने काम करते आहे. आमच्या प्रयत्नांना सोलापूरकरांसह राज्यातील शिवप्रेमी नक्की दाद देतील अशी अपेक्षा आहे.” मनोजटोणपे, सुरेश संबाळ, संकल्पना दिग्दर्शन

संभाजीराजेंच्या अल्बमला लाखोंच्या लाइक
मनोज आणि सुरेश यांनी तयार केलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या अल्बमला यू ट्यूब फेसबुक आणि इतर मीडियावर एक लाख ६० हजार अशा लाइक मिळाल्या आहेत. त्यांच्या या यशामुळेच त्यांना ही पुढची संकल्पना सुचली. विविध प्रकारच्या अल्बमच्या मागे लागण्यापेक्षा काही तरी चांगले करण्याच्या हेतूने ते दोघे या विषयाकडे वळले, अशी त्यांनी माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...