आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत रंगला तरुणाईचा मेळा, सोलापूर विद्यापीठाचा १३ वा युवा महोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदाताई तिवाडी रंगमंच - पंढरीच्यापावन नगरीत सोलापूर विद्यापीठाच्या तेराव्या युवा महोत्सवाचा पहिला दिवस तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित युवा महोत्सवात वैष्णवाच्या मेळ्याप्रमाणे तरुणाईचा मेळा भरल्याची प्रचिती येत होती. पहिल्या दिवशी मूकनाट्य, समूहगान, प्रश्नमंजूषा आणि एकांकिका स्पर्धांत तरुणाईची चुरस पाहायला मिळाली.
प्रारंभी युवा महोत्सवाच्या उद््घाटनाचा मुख्य कार्यक्रम विठ्ठल अभियांत्रिकीच्या आवारातील भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी मुख्य रंगमंच झाला. तत्पूर्वी पंढरीच्या वारीमधील मुख्य आकर्षण असलेल्या दिंडीच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी श्री विठ्ठल अभियांत्रिकी कॉलेजचे वैशिष्ट्य सांगितले. आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते उद््घाटन झाले. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते.

श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्य रंगमंच भारूडसम्राज्ञी चंद्राताई तिवाडी, मृदंगाचार्य कै. शंकरप्पा मंगळवेढेकर संगीत मंच, शब्दोत्सव सभागृह आणि कलोत्सव दालन या चारही रंगमंचांवर विविध कला सादरीकरणाकरीता तरुणाईचा जल्लोष ओसंडून वाहत होता. उद््घाटनानंतर मुख्य रंगमंचावर मूकनाट्यातून बोलके हावभाव करून सामाजिकतेचा सध्याच्या वास्तवतेवरील संदेश तरुणांनी दिला. आणि संध्याकाळच्या वेळी एकांकिका सादर झाल्या. शब्दोत्सव सभागृहातून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.
मृदंगाचार्य कै. शंकरप्पा मंगळवेढेकर संगीत मंचावर समूहगीत सूरवाद्यामध्ये ढोलकी, संबळ, तबला, पेटी डफावर तरुण-तरुणींचा स्वर घुमू लागला होता. एकापेक्षा एक सरस अशी गीते या वेळी ऐकावयास मिळाली. ही गीते ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर कलोत्सव दालन सभागृहात कातरकाम भित्तीचित्र स्पर्धेत आपल्या कुंचल्यातून चित्र साकारत होते. यामध्ये रक्तदान श्रेष्ठदान, पर्यावरण जागृती, महिला सबलीकरण, मतदार, व्यसनमुक्ती आदी विषय दिले होते. युवा महोत्सवामध्ये सहभागी कलाकारांना उपस्थित मान्यवरांसह सर्वांनीच मनापासून दाद दिली. रिमझिम पावसातही तरुणाईने कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती.

युवा महोत्सवात ५८ संघांचा सहभाग
सोलापूरविद्यापीठ युवा महोत्सव श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या महोत्सवात ५८ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये ८१६ मुले, ५२५ मुली, ६७ साथीदार संघव्यवस्थापक पुरुष ६९ आणि महिला ३५ अशी संख्या आहे. यामध्ये श्री विठ्ठल अभियांत्रिकी, शिवाजी महाविद्यालय, वालचंद, दयानंद, संगमेश्वर, वसुंधरा सोलापूर, शंकरराव मोहिते -पाटील अकलूज, उमा महाविद्यालय, केबीपी कॉलेज पंढरपूर, सांगोला महाविद्यालय यांनी जवळपास सर्वच कलाप्रकारांत सहाभाग नोंदवला आहे.
बातम्या आणखी आहेत...