आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेशिवाय जीवनात रंग नाही, रस नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी रंगमंच - विद्यार्थ्यांनीमनोरंजन म्हणून नव्हे तर करिअर म्हणून कलेकडे पाहावे. प्रत्येकाने एखादी कला जोपासावी. त्याशिवाय जीवनात रंग आणि रस नाही. रंग, रसाशिवाय कला नसल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. रविवारी गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाच्या १३ व्या युवा महोत्सवाचे उद््घाटन सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या क्षेत्रात उंची गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. ध्येय गाठण्यासाठी स्पर्धा खिलाडू वृत्ती, सकारात्मक ऊर्जा निकोप असावी. महोत्सवाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या.

जिल्ह्यातगुणवत्तेची कमतरता नाही. अनेक नामवंत कलाकार या मातीत घडले आहेत. त्यांचा आदर्श घ्या. आपल्याकडे जे काही चांगले आहे, श्रेष्ठ आहे तेच या जगाला द्या. २००८ मध्येही स्वेरी महाविद्यालयात युवा महोत्सव झाला होता. या वेळेसही नेटक्या नियोजनाने हा महोत्सव घडवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. प्रास्ताविकात स्वेरीचे प्राचार्य, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यंदाचा युवा महोत्सव अधिक दर्जेदार करण्याची त्यांनी ग्वाही दिली.

याप्रसंगी विद्यापीठाच्या बीसीयूडीचे संचालक प्राचार्य आर. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव देबेंद्रनाथ मिश्रा, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, वित्त लेखाधिकारी बी. सी. शेवाळे, डॉ. बी. एन. कांबळे, डॉ. एस. एस. तोरवी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी, गोपाळपूरच्या सरपंच आसबे, सी. बी. नाडगौडा, आर. बी. रिसवडकर, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. चंद्रकांत कोळेकर, विश्वनाथ आवड, मोहिनी पत्की, राम पवार, झाकीर हुसेन मुलाणी, डॉ. संतोष राजगुरू, डॉ. गुणवंत सरवदे, डॉ. शिवाजी वाघमोडे, प्रा. मधुकर पवार, बापू राऊत, डॉ. अभय उत्पात, प्रा. हनुमंत मते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
अष्टगंधाचा नाम
दिंडीलापंढरीच्या वारीचा फिल येण्यासाठी विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या कपाळावर बुक्का, अष्टगंधासह चंदनाचा नाम लावला जात होता. कुलगुरूंपासून विद्यार्थी, विद्यार्थिनींपर्यंत प्रत्येकाच्या कपाळावर नाम होता.

दिंडीचे आयोजन
युवामहोत्सवाआधी पंढरीतील वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते. यात जोगदंड वारकरी शिक्षण संस्थेतील बाल कीर्तनकार, प्रवचनकार वारकरी विद्यार्थी ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष करत टाळ, मृदंग वाजवत, अभंग गात सहभागी झाले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीसह वारकरी सांप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यांनी वारकरी महिलांप्रमाणे खास केसाचा आंबाडा बांधून, त्याभोवती गजरा माळून, पारंपरिक नऊवारी साडी नेसून, डोक्यावर तुळशी वृदांवन पाण्याच्या घागरी घेतल्या होत्या.
पंढरपूर येथील ‘स्वेरी’ महाविद्यालयात विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते रविवारी उद््घाटन झाले. या वेळी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, डॉ. बी. पी. रोंगे यांच्यासह विद्यापीठच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छाया : राजू बाबर
बातम्या आणखी आहेत...