आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी पदािधकारी, अधिकाऱ्यांनी दिला ‘नो-व्हेइकल डे’ला फाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवार ‘नो व्हेइकल डे’ राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित घेतला. मात्र, शनिवारी आवारात वाहने दिसून आली.
मोहिमेत तीन वर्षांपूर्वी उस्फूर्तपणे सहभागी झाले. काही वर्षापासून रखडलेले अभियान गेल्या पाच महिन्यांपासून पुन्हा सुरू झाले. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्यासह अनेक कर्मचारी सायकलीवर आले. कर्मचाऱ्यांसाठी महापालिका परिवहन विभागाच्या स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली होती.
सुरुवातीचे काही महिने पदाधिकाऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळाला. पण, शनिवारी एक ऑगस्टला अभियानाला अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून हरताळ फासला गेला. अध्यक्षांसह विषय समिती सभापती अधिकाऱ्यांची वाहने थेट मुख्यालय आवारात लावण्यात आली. शनिवारी झेडपीत आलेल्या कर्मचारी अभ्यागतांची वाहने बाहेरच थांबवण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आवारात शनिवारी वाहने दिसून आली.

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहन वापरले
ग्रामविकासराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा शनिवारी जिल्हा परिषेदत दौरा होता. त्यामुळे आम्ही अधिकारी वाहनातूनच फिरत होतो. मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे ‘नो व्हेइकल डे’ राबविता आला नाही. प्रसंगानुरूप धोरणात शिथिलता आणावी लागली. त्यामुळे वाहनांचा वापर करावा लागला.” प्रभूजाधव, प्रशासनविभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...