आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कुस्ती : संयोजनात सोलापूरचे ज्योती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येत्या डिसेंबरमध्ये भारतात दुबईत विश्वविजेता गामा रेसलिंग चषक २०१६ या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएल, टी-20 आणि प्रो - कबड्डी या सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील ५० देशांतील १०० कुस्तीगीर सहभागी होत आहे. विशेष म्हणजे या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे संयोजन मूळचे सोलापूरचे असलेले शेखर ज्योती करत आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

रेसलिंग या क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी विजेत्यास कोटीचे बक्षीस आहे. तसेच उपविजेत्यास ५० लाख तृतीय क्रमांकास २५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

अहमदनगर रेसलिंग असोसिएशन डिम्स् मार्वल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ८५ ते १२५ किलो वजनी गटात या स्पर्धा होतील. ऑलोम्पिक स्पर्धेसह अमेरिकन, एशियन, युरोपियन अफ्रिकन येथे झालेल्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत भाग घेतलेले कुस्तीगीर यात सहभागी होणार आहेत.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि महाराष्ट्र राज्य रेसलिंग असोसिएशन यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. शिवाय भारताच्या प्रतिनिधी निवडण्यात येणाऱ्यांना हिंद महाबली असा किताब असणार आहे. राऊंड रॉबिन या प्राथमिक फेऱ्या दिल्ली मुंबई येथे होणार आहेत. तर उपांत्य अंतिम फेरी दुबई येथे होत असल्याचे शेखर ज्योती यांनी सांगितले.
याचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला. यावेळी राज्याचे मत्स्योद्योग दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर, डब्ल्यूएफआयचे सचिव टी. एन. मसूद, राज्य ऑलिंपिक कुस्ती असोसिएशनचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कर्नाटक कुस्तीचे सोहाग सरकार, ऑलिंपिक कुस्तीगीर मारुती आडकर, जयहिंद केसरी योगेश दोडके यांची उपस्थिती होती. या स्पर्धेतून एक नवा विश्वविजेता गामा कुस्तीपटू उदयास येईल.

छंद ध्येय
तांबड्या मातीतील कुस्ती सर्वांना माहीत आहे. याचे स्वरूप आता बदलून कुस्ती मॅटवर आले आहे. हा खेळ आपली संस्कृती आहे. प्राचीन ग्रंथातही भीम, दुर्योधन आदी कुस्तीपटू असल्याचे पुरावे आहेत. या खेळास जागतिक दर्जाचा खेळाडू मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. शेखर ज्योती, संयोजक
बातम्या आणखी आहेत...