आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटनेत 14 म्हशी गमावल्‍या; सोलापूरकरांचा मदतीचा हात, केली 25 हजारांची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गायी म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या...हे दिवाळीतील गीत आपण लहानपणापासून ऐकतो. त्याची सुरुवातच वसुबारसेने होते. गाई-म्हशींच्या सन्मानाच्या या सणात शहरात एक अप्रिय घटना घडली. कन्ना चौक परिसरात राहणाऱ्या प्रभाकर ऊर्फ आप्पाराव जानगवळींच्या १४ म्हशी विजेचा धक्क्याने मृत्युमुखी पडल्या. सोशल मीडियामुळे जोडल्या गेलेल्या परजिल्ह्यांतील कनवाळूंनी त्याला लगेच प्रतिसाद देत २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली. १३ ऑक्टोबरला सायंकाळी अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमी परिसरात ही घटना घडली होती. 

येथील एका खड्ड्यात या म्हशी धुतल्या जातात. नेमके त्याच दिवशी तेथील एक विद्युत वाहक तार तुटून या पाण्यात पडली आणि या मुक्या म्हशींचा जीव गेला. त्याने जानगवळी यांच्या जीवनाचा आधारच निसटला. दिवसाकाठी एकेक म्हैस १० ते १२ लिटर दूध द्यायची. पण या आकस्मित घटनेमुळे जानगवळी यांची उपजीविकाच थांबली. त्याची दखल घेत सोलापूरकरांनी लगेच आपला मदतीचा हात पुढे केला. आपापल्या परीने ५०० रुपये, १००० रुपये जमा करत माणुसकी जागवली. यात सुलेखनकार अभिजित भडंगे यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे. अजूनही ज्यांना मदत करावयाची आहे, त्यांनी ९०११०१४३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अजूनही माणुसकी आहे 
ही घटनाखूप दुर्दैवी होती. वाचूनच मन हेलावून गेले. माणुसकीच्या नात्याने मी ही सेवा केली आहे. अजूनही या कुटुंबास आर्थिक मदतीची गरज आहे. ती किमान पूर्ण व्हावी, ही अपेक्षा. 
- अभिजित भडंगे, नागरिक 
बातम्या आणखी आहेत...