आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कराटे स्पर्धेत सोलापूरच्या भुवनेश्वरी जाधवला सुवर्ण व रौप्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जागतिक कराटे स्पर्धेत येथील भुवनेश्वरी सुरेश जाधव हिने एक सुवर्ण एक रौप्य पदक पटकावले. अमेरिकेतील ओरलँडो फ्लोरिडा येथेे झालेल्या स्पर्धेत तिने ट्रेडिशनल वेपन काता प्रकारात सुवर्ण तर कुमिते फाइट प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. सुवर्णपदकासाठी तिला २२ देशांतील कराटेपटूंबरोबर सामना करावा लागला.

पारंपरिक शस्त्र प्रदर्शनासाठी प्रदान झालेल्या सुवर्णमुळे भुवनेश्वरी विश्वस्तरीय कराटे प्रकारातील इतिहासातील पहिली भारतीय विजयी युवती कराटेपटू ठरली आहे. तिने ट्रेडिशनल वेपन काता प्रकारात प्राचीन भारतीय युद्धकला कलरीपयतमधील सोर्ड हे शस्त्र प्रदर्शित केले. कुमिते फाइट प्रकारात अंतिम फेरीत जर्मनीच्या अॅग्वदा सबिहाविरुद्ध खेळताना केवळ एका गुणाने तिचे सुवर्ण हुकले. पण आक्रमक चढाई किकद्वारे विजय मिळविण्याचा भुवनेश्वरीने आटोकाट प्रयत्न केला. तिला वडिलांबरोबरच आई संगीता आणि अोकिनावन ग्रँडमास्टर श्रीनिवास कलरीपयतचे नारायण गुरू यांचे मार्गदर्शन लाभले. पतंजली योगपीठाचे स्वामी बाबा रामदेव यांनी तिला प्रायोजित केले होते.
बातम्या आणखी आहेत...