आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय फॅशन जगतात सोलापूरची श्रुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबई विद्यापीठात फॅशन डिझाइनची पदवी घेऊन लंडनमध्ये ‘एमबीए’ करणारी आणि तिथून पॅरिसच्या ‘फॅशन ट्रेड शो’मध्ये सहभागी होणारी कन्या सोलापूरची आहे. श्रुती गड्डम- श्रीपती हे तिचे नाव. तिने तयार केलेली काही उंची वस्त्रे केवळ बॉलीवूड नव्हे, तर हॉलीवूडमधल्या अभिनेत्रींनी ही परिधान केली आहेत. रॅम्पवरून चालणाऱ्या मॉडेलनी तिच्या वस्त्रांनी मिरवले.

येथील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रुतीने मुंबईच्या ठाकरसेन (एसएनडीटी) विद्यापीठातून बी.एस्सी. (बॅचलर ऑफ सायन्स : फॅशन डिझाइन)ची पदवी मिळवली. त्यानंतर बंगळुरूच्या शाही एक्स्पोर्टसमध्ये इंटर्नशीप पूर्ण केले. तिथून आंतरराष्ट्रीय फॅशनच्या जगतात तिने प्रवेश मिळवला. लंडनच्या कॉन्व्हेंट्री विद्यापीठातून ‘इंटरनॅशनल फॅशन मॅनेजमेंट’मध्ये ‘एमबीए’ पूर्ण केले. लंडन सोडून थेट पॅरिसच्या ‘फॅशन ट्रेड शो’मध्ये प्रवेश केला. आज तिचे नाव आंतरराष्ट्रीय फॅशन जगतात आहे.

श्रुतीचा परदेश प्रवास लग्नानंतर सुरू झाला. पती रमेशबाबू हैदराबादच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. घरातून पाठबळ मिळाले ते आईकडून. वडील सत्यनारायण गड्डम अशोक चौकातील प्रगत टॉवेल उत्पादक आहेत. वस्त्रोद्योगाचे बाळकडू श्रुतीला घरातूनच मिळाले. परंतु तिने आधुनिक फॅशनची कास धरली. त्यासाठी तिला घरदार सोडावे लागले होते. आज ती हैदराबाद येथे काम करतेय. सोलापुरातही खूप काही करण्याची इच्छा आहे.

त्रिपूर सुंदरीत गुरुवारपासून प्रदर्शन
श्रुतीची कलाकुसर सोलापूरकरांना पाहता यावी, यासाठी हॉटेल त्रिपूरसुंदरीच्या उपासना दालनात आणि नोव्हेंबरला फॅशन प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी ११ ते रात्री पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. युवती आणि महिलांसाठी आधुनिक फॅशनची वस्त्रे यात असणार आहेत. प्रिसिजन उद्योग समूहाच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन होणार असल्याची माहिती श्रुतीच्या आई गीता गड्डम यांनी दिली.