आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेवर ई-लर्निंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - लोकसहभागातून सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-लर्निंग क्लासरूमच्या उभारणीचा मराठवाड्यातील पहिला यशस्वी प्रयोग खेड (ता. उस्मानाबाद) येथील जिल्हा परिषदेच्या छोट्याशा शाळेने करून दाखवला आहे. या संगणकीय शाळेचे उद्घाटन मंगळवारी(दि.७) करण्यात आले असून, सौरऊर्जेच्या वापराचे महत्त्व विद्यार्थ्यांनाही पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील षष्ठीपाडा या शाळेत यापूर्वी सौरऊर्जेवर चालणारा ई- लर्निंगचा उपक्रम राबविला आहे.

जून १९१८ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत १९० विद्यार्थी शकि्षण घेत असून, त्यांना मुख्याध्यापकांसह सहा शकि्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी जगदाळे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अमृता लाटे यांच्या कल्पनेतून लोकसहभागातून सौरऊर्जेवर चालणारा ई-लर्निंग क्लासरूम उभारण्याची तयारी करण्यात आली. त्यानुसार गावकऱ्यांच्या पुढाकाराने ही योजना अंमलात आणण्यासाठी प्रशालेतील सात शकि्षकांनी एक लाख ९२ हजार रुपये लोकवर्गणी जमा केली. या रकमेतून त्यांनी संगणक कक्ष बनविला असून, त्यात संगणक प्रोजेक्टर सात बाय पाच आकाराचा भिंतीवर स्क्रीन बनविला आहे. बालाजी आवटे रवी सोनटक्के यांच्या कल्पनेतून भिंतीवर स्क्रीन साकारला आहे. या संगणक कक्षाचे तसेच ई- लर्निंग उपक्रमाचे उदघाटन मंगळवारी गावक-यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

खेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकवर्गणीतून सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-लर्निंग क्लासची सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रयोग मराठवाड्यात पहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वीज गेल्यानंतरही संगणकीय ज्ञान मिळणार आहे.

जशी गरज पडेल तशी आणखी सीडी खरेदी करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा उपक्रम राबविला जाईल. मराठवाड्यात सर्वप्रथम आम्ही हा प्रकल्प उभा केला, तो गौरवास्पद आहे.’’ संभाजीजगदाळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, खेड.

अधिका-यांची पाठ
लोकसहभागातून सौरऊर्जेवरील ई-लर्निंग सुरू करण्याचा मान खेड शाळेने मिळविला असला तरी शकि्षण विभागाच्या अधिका-यांना त्याचे फारसे महत्त्व नाही. कारण शकि्षकांचे कौतुक करण्यासाठी किंवा उपक्रमाच्या उदघाटनासाठी शकि्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी हजर राहिला नाही.

यांचीही मिळाली मदत
याउपक्रमासाठी लोकमंगल मल्टिस्टेटकडून एक संगणक राजाभाऊ टकले यांच्याकडून प्रोजेक्टर भेट मिळाल्यामुळे हे काम आणखी सोपे झाले. याशिवाय लिंबराज टकले, शिवाजी गरड, डॉ. रणजीत कदम, नितीन गरड, महादेव गवाड, विवेकानंद लोमटे या शकि्षणप्रेमी व्यक्तींनी, शकि्षकांनी ग्रामस्थांनी आर्थकि मदत केल्यामुळे मराठवाड्यात पहिली सौरऊर्जेवरील ई-लर्निंग करण्याच मान खेड शाळेला मिळाला आहे.

असे मिळेल ज्ञान
बालकांनाया कक्षामधून शालेय अभ्यासक्रमासह महाराष्ट्रातील गड, किल्ले, भौगोलकि माहिती, परिसराचे ज्ञान, जनरल नॉलेज आदींची माहिती देणे सोईस्कर झाले आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना रोज दुपारच्या सत्रात संगणकीय कक्षात बसूनच आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळणार आहे. यासाठी प्रत्येक वर्गाच्या चार सिडी उपलब्ध असून, १६ सीडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात येणार आहे.