आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक कांबळे यांची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. संजय नामदेव कांबळे (वय ४५, रा. गुंजेगाव) यांनी फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २१) सकाळी ६.३० वाजता गुंजेगाव येथील पशुखाद्याच्या दुकानात घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची मंगळवेढा पोलिसांत आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.

संजय कांबळे यांचे गुंजेगाव येथे पशुखाद्याचे दुकान आहे. या दुकानातच त्यांनी मंगळवारी सकाळी ६.३० पूर्वी दुकानात फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली. अर्जुन भीमराव कांबळे यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. कांबळे यांनी मंगळवेढा येथील पांडुरंग नागरी बिगरशेती पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक, गुंजेगाव विकास सोसायटीचे संचालक, गजानन कुकुटपालन संस्थेचे संचालक आदी पदांवर काम केले असून, गेल्याच महिन्यात त्यांची राज्य गटसचिव फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाली होती.
बातम्या आणखी आहेत...