आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या निधनाने प्रेरणा, स्थापली सेवाभावी संस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एका रुपयाचीही अपेक्षा करता केवळ सेवा करण्याच्या उद्देशाने सोलापुरात २२ युवक धवलायन फाउंडेशनच्या माध्यमाने कर्करुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना समुदपेशन करणे, सेवा करणे, औषधौपचारासाठी मदत, रुग्णांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करणे अशी अनेक कामे ही तरुण मंडळी आनंदाने करतात. गेल्या पाच वर्षात सुमारे दीड हजार रुग्णांना दिलासा देत भावनिक आणि आर्थिक पाठिंबा देण्याचे सकारात्मक काम त्यांनी केले आहे.

सेवेच्या रूपाने, मानवतेच्या दृष्टीने ही मंडळी काम करतात. त्यांची धडपड पाहून अनेक लोक आर्थिक मदतही करतात. त्यासाठी मदत मागितली जात नाही. सामान्य कुटंुबातील रुग्णाला नातेवाइकांनाही समुपदेशनाचेही काम धवलायनचे युवक करतात.

चार वर्षांचा धवल कर्करोगाने दगावला होता
संस्थेचेसंस्थापक अध्यक्ष विक्रम पिस्के यांचा वर्षाचा मुलगा धवल याचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्याचे जाणे पिस्के या युवकाला मानसिक पातळीवर उद््ध्वस्त करणारे होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी धवलायन संस्थेची स्थापना केली. त्यामार्फत २०११पासून कर्करोगग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरू केले.

हे आहेत युवक
मारुतीकोळी, व्यंकटेश पोगूल, अरविंद बटगिरी, बाळकृष्ण दोड्डी, श्रीनिवास जोगी, नारायण गुंडेली, अशोक बल्ला, श्रीनिवास सामल, कलावती बेल्लद, वंदना कांबळे पिस्के, योगेश महिंद्रकर आदी.

मोठे समाधान
इतरांचे दु:ख कसे कमी करता येईल याचा विचार करतो. त्याने जो आनंद मिळतो तो अनमोल असतो. माझे सहकारी मित्र हे खूप कष्ट करतात. मोबदल्यात त्यांच्या तोंडी समाधानाचे बोल असतात. हे काम अखंड करणार.” विक्रम पिस्के, संस्थापक, धवलायन
बातम्या आणखी आहेत...