आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईस हाकलल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा झाेपेत खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - नेहमी हाेणाऱ्या वादामुळे आईस घरामधून हाकलून दिल्यामुळे पिता-पुत्रामध्ये वारंवार खटके उडत. याचे पर्यवसान खुनात झाले. वडील महादेव सीताराम कांबळे (५०) हे झोपेत असताना मुलगा रखमाजी महादेव कांबळे (२० ) याने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास चांभारवाडी, रड्डे (ता. मंगळवेढा) येथे घडली. याप्रकरणी अाराेपी रखमाजीचा भाऊ परशुराम याने पाेलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यावरून रखमाजीला अटक करण्यात अाली अाहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती : संशयित आरोपी रखमाजी हा अविवाहित असून तो खासगी मालट्रकवर चालक म्हणून काम करतो. त्याचे वडील महादेव कांबळे व अाई लक्ष्मीबाई कांबळे या दांपत्यामध्ये किरकोळ कारणांवरून नेहमीच भांडणे होत हाेती. हे मुलांना पटत नव्हते. याच कारणावरून अनेकदा रखमाजीचे वडिलांशी वादही व्हायचे. दरम्यान, या वादाला कंटाळून लक्ष्मीबाई दीड महिन्यापूर्वीच मुलगी वैशाली हिच्याकडे (कराड जि. सातारा) राहण्यासाठी निघून गेली होती. शुक्रवारी संशयित आरोपी रखमाजी कांबळे हा त्याच्या ताब्यातील मालट्रक मंगळवेढा येथे लावून रड्डे येथील घरी आला. त्या वेळी ‘आईला का हाकलून दिले?’ म्हणून त्याने वडिलांना जाब विचारला. याच कारणावरून दाेघांत भांडण झाले. त्यानंतर महादेव कांबळे हे झोपले असताना रखमाजी याने रविवारी पहाटे डोक्यात दगड घालून ठार केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...