आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी हेरिटेज येथे मधुरिमा सदस्यांसाठी गीतांची मैफल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रंगबरसे भिगे चुनरवाली..., होली के दिन दिल मिल जाते है..., खेळताना रंग बायी होळीचा होळीचा... अशा होळीवरील मनमोहक गीतांची मैफल शनिवारी (दि. ११) सायंकाळी वाजता गांधीनगर येथील हेरिटेज लॉनवर रंगणार आहे. दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा क्लबने महिला दिन आणि होळीनिमित्त मधुरिमा सदस्यांसाठी होळीवरील हिंदी-मराठी गीतांची मैफल आयोजित केली आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका अनघा काळे, गायक गौरव पवार, मुन्नावर अली आणि सहकलाकर यांच्या सुरेल गीतांचे सादरीकरण होणार आहे. 
 
टिळा होळीचे केले आहे आयोजन 
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे दै. दिव्य मराठीच्या वतीने यंदाही टिळा होळीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणाऱ्या घातक परिणामांनाही यामुळे आवर घालता येणार आहे. नैसर्गिक रंगांपासून टिळा होळी खेळली जाणार आहे. सोलापूरकरांनी रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचा वापर करून टिळा होळी खेळावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 
 
मधुरिमा क्लबसाठी नावनोंदणी सुरू 
मधुरिमाक्लब सदस्यता नोंदणी अजूनही सुरू आहे. प्रवेश शुल्क जुन्या सदस्यांसाठी ३०० रुपये तर नवीन सदस्यासाठी ४०० रुपये आहे. मधुरिमा क्लबसाठी नाव नोंदणी केल्यावर ६८० रुपयांचे हॅन्डी केटेनर मिळेल. वाढदिवसानिमित्त दैनिकात नाव देण्यात येईल. फ्री ब्युटी पॅकेजमध्ये अॅडव्हान्स हेअर कट, हॅन्ड स्पॉ, फेशिअल, आय ब्रो मोफत मिळणार आहे. लकी ड्रॉद्वारे ११० भाग्यवान सदस्यांना डिझायनर साडी, चॉपर, पुणेरी नथ, बांगड्या, फ्राॅय पॅन, नेकलेस आदी मिळतील. ज्या भगिनी अद्याप सदस्य झाल्या नाहीत त्यांनी आजच जवळच्या नाव नोंदणी केंद्रावर सदस्य व्हावे. कार्यक्रम स्थळीही सदस्य नोंदणी सुरू असेल. अधिक माहितीसाठी संपर्क ७७९८८८१७७७. 
 
बातम्या आणखी आहेत...