आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगल स्कोअरवर वाजतोय सोलापुरी गीतकार संजीव मोरे यांचा डंका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गूगल संकेत स्थळाच्या "गूगल स्कोअर'वर सोलापूरचे गीतकार संजीव मोरे यांच्या गीताचा बोलबाला सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांची क्षणचित्रे, लाइव्ह स्कोअर पाहण्याची सोय गूगल स्कोअर या आॅप्शनवर आहे. घुमाके बल्ला रे, कर दे तु कल्ला रे, तेरे आगे आसमाँ हे खुल्ला रे... असे हे गीत आहे. याला क्लिक केल्याशिवाय स्कोअरच दिसत नाही.

मूळचे पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडीचे रहिवासी असणारे मोरे हे मागील १२ ते १३ वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. त्यांनी आजवर बऱ्याच गाण्यांच्या धून, टीव्ही रेडिओवरच्या जाहिराती, त्याच्या जिंगल्स, स्लोगन, टॅग लाइन करण्याचे काम केले आहे. मागील वर्षीच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५ साठी त्यांनी तयार केलेले हे गाणे खूपच गाजले. तसेच यंदाच्या सुरू असलेल्या सामन्यांच्या लाइव्ह अपडेट आणि स्कोअरसाठी गूगलने याच गाण्याचा पर्याय निवडला आहे.
सध्या संजीव मोरे हे व्हर्लपूल, फिलिप्स ट्यूब अॅण्ड बल्ब्स, कॅडबरी, डेरीमिल्क आदी नामवंत कंपन्यांसाठी काम करत आहेत. घुमाके बल्ला या गाण्यात विविध क्रिकेटपटूंचा सहभाग दाखवण्यात आला आहे.

अजून बरेच काही
^मी यापूर्वी बरीच कामे केली आहेत, करत आहे. या गाण्यामुळे मी थोडा नावारूपाला आलोय. गूगलसारख्या नामवंत संकेतस्थळाने हे गाणे निवडणे म्हणजे माझ्यासाठी अतिशय आनंदाची अभिमानाची बाब आहे. संजीव मोरे, गीतकार

असे आहे गाणे
घुमाके बल्ला हे जवळपास मिनिट १७ सेकंदाचे व्हिडीओ(चित्रीकरण) गीत आहे. औरंगाबादचे प्रणव यांचे संगीत, शीतल मोरे यांनी प्रोडक्शन (निर्माते) तर श्रीधर भावे यांचे डिरेक्शन आहे. याचे चित्रिकरण निशांत गाला यांनी केले असून गाण्याचे वैशिष्ट्य असे की तेलुगुतील अग्रक्रमाची अभिनेत्री अनुया भागवतने यातील काही ओळींचे गायन केले आहे. तिने तेलुगुतील प्रख्यात निर्माते शंकर यांच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. तसेच या गाण्याला मंगेश चव्हाण, दीपक चौगुले सर्जेराव बोटे यांचा आवाज आहे. या गीताचे अजय-अतुल यांनीही कौतुक केले आहे.