आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soregaon Firing : Along With Stengan Fith Convict Arrested

सोरेगाव गोळीबार: स्टेनगनसह पाचवा आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोरेगावगोळीबार प्रकरणातील पलायन केलेला पाचवा संशयित आरोपी रमेश यलगौंडा कोळी (रा. अगरखेड, ता. इंडी) यास बुधवारी अटक केली. अगरखेड येथील त्याच्या घरातून एक गावठी स्टेनगन, जिवंत काडतुसे जप्त केली. यापूर्वी या प्रकरणात दोन गावठी पिस्तुल चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कर्नाटकातील चौघेजण गावठी शस्त्रे विकण्यास सोरेगाव परिसरात आले होते. शनिवारी त्यांना अटक करताना गणेश शिर्के या पोलिसावर गोळीबार झाला होता. बुधवारी पुन्हा रमेश याच्याकडे मोठी हत्यारे सापडली आहेत. नेमके या टोळीचे सत्य गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे. घटनेला चार दिवसांचा कालवधी लोटला तरी मूळ आरोपीकडून विक्रीस आणलेले रिव्हलव्हर कोणाला विकणार होते, त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेले काशीनाथ गोळगी, गौडप्पा बिराजदार, चंद्रकांत कोळी, शंकरलिंग जेऊर यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.