आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sorrow Of Grand Mother Death, Grandson Committed Suicide

आजीच्या निधनाचे दु:ख; नातवाने केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - आजीच्या निधनाचे दु:ख सहन झाल्याने १६ वर्षीय नातवाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. २०) दुपारी पावणेचारच्या सुमारास भोसरे (ता. माढा) येथील बागल वस्तीवर ही घटना घडली. राहुल रामचंद्र बागल (वय १६, रा. बागल वस्ती, भोसरे, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी सुग्रीव नारायण बागल यांनी कुर्डुवाडी पोलिसांत खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भोसरे येथील बागल वस्तीवरील राहुल बागल याची आजी शांताबाई उत्तम बागल यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीची तयारी सुरू होती. या वेळी त्याची बहीण विधीसाठी पंचारती आणण्यासाठी घरात गेली. त्यावेळी ितने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो उघडला नाही. तिने दरवाजा उघडत नसल्याचे इतरांना सांगितले. त्यानंतर दरवाजा उघडला असता राहुल याने गळफास घेतल्याचे दिसले. बेल्टनेघेतला गळफास : आजीशांताबाई बागल यांच्या निधनाचे दु:ख राहुलला सहन झाले नाही. त्याचा त्याने धसका घेतला. त्यामुळे त्याने घरामध्ये जाऊन कापडी निळ्या बेल्टने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कराटेसाठी झाली होती निवड
राहुलबागल हा विनायकराव पाटील विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. तो कराटे चॅम्पियन होता. कराटे स्पर्धेसाठी श्रीलंका येथे त्याची निवड झाली होती. या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.