आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरची दोन सुवर्ण, पाच रौप्य पदकांची आतषबाजी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिण आशियाई जलतरण स्पर्धेतील डायव्हिंग प्रकारात सोलापूरच्या चार डायव्हिंगपटूंनी सुवर्ण रौप्य अशी सात पदके पटकाविली.
कोलंबो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या ईशा वाघमोडेने सुवर्ण तर लिटिल फ्लॉवर स्कूलच्या रिया मुस्तारे ऑर्किड स्कूलच्या ओम अवस्थीने प्रत्येकी रौप्य पदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील गटात सेंट जोसेफ स्कूलच्या बिल्वा गिरामने मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये एक रौप्य पदक कमावले.

ईशारियाची पहिल्याच प्रयत्नात पदके :दक्षिण आशियाई स्पर्धेत वयोगटातून २००० मध्ये तृष्णा पटेलने कांस्य पदके पटकावली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर सोलापूरच्या या डायव्हिंगपटूंनी सोलापूर जिल्हा जलतरण संघटनेला भरघोस यश मिळवून दिले आहे. बिल्वा ओमने गतवर्षी शालेय जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता. चौघांचीही कामगिरी कौतुकास्पद आहे. परंतु ईशा रिया गतवर्षी राज्य स्पर्धेतून बाहेर पडले होते. यंदा त्यांनी राष्ट्रीय आशियाई पातळीवर पहिल्याच प्रयत्नात पदकांची कमाई केली आहे.
खेळाडूंचेकष्ट पालिकेचे सहकार्य : आम्हीखेळाडूंना मार्गदर्शन केले असले तरी या यशामागे खेळाडूंचे कष्ट आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा जवळ आल्यानंतर सकाळ , दुपार सायंकाळी तलावावर सराव करण्यासाठी पालिकेचे क्रीडाधिकारी नजीर शेख यांचे सहकार्य लाभते. त्यामुळेच असे भरीव यश मिळाले. - श्रीकांत शेटे मनीष भावसार, प्रशिक्षक

सावरकरतलावावर अत्याधुनिक डायव्हिंग बोर्ड हवा : मार्कंडेयतलावावर अत्याधुनिक डायव्हिंग बोर्ड आहे. परंतु वीर सावरकर तलावावार हा बोर्ड नाही. या तलावावर सराव करणारे ओम, बिल्वा, रिया यांनी रौप्य तर मार्कंडेय तलावावर सराव करणाऱ्या ईशाने सुवर्णपदकाची कमाई केली. सावरकर तलावावर अत्याधुनिक बोर्ड हवा, अशी मागणी जलतरण संघटना श्री अॅक्वेटिक क्लबने यापूर्वी अनेक वेळा महापालिका लोकप्रतिनिधींकडे केली होती. परंतु अद्याप ती पूर्ण झालेली नाही.

आशियाई डायव्हिंग स्पर्धेत शानदार कामगिरीने पदकप्राप्त करणारे (डावीकडून) ईशा वाघमोडे, रिया मुस्तारे, बिल्वा गिराम, अवस्थी
बातम्या आणखी आहेत...