आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण विभागीय महिला क्रिकेट संघात सोलापूरच्या चौघींची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिणविभागीय १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात सोलापूरच्या चौघींची निवड झाली. मानसी जाधव, साक्षी वाघमोडे, तेजस्विनी कलशेट्टी अमूल्या श्रीगांधी असे ते खेळाडू आहेत. नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत सोलापूरसह, उस्मानाबाद, सांगली सातारा येथील खेळाडूंनी भाग घेतला होता.
इंदिरा गांधी स्टेडियमवर १० ते १३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अांतरविभागीय स्पर्धेसाठी हे संघ जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी जाहीर केले. संघास संघटनेचे चेअरमन रणजितसिंह मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या. आंतरविभागीय स्पर्धेत पुण्यासह पूर्व, पश्चिम, दक्षिण हे विभाग भाग घेणार आहेत. दक्षिण विभागाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांगलीच्या सोनाली शिंदे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोलापूरच्या मानसी जाधव हिच्याकडे सोपविण्यात आली आहे.

संघ: सोनाली शिंदे, मानसी जाधव, तपस्या निकम, साक्षी वाघमोडे, अमृता पाटील, सोनल भोसले, दीपाली लकडे, मानसी कपाले, राजश्री हकारे, सोनल पाटील, ज्योती शिंदे, तेजस्विनी कलशेट्टी, अमूल्या श्रीगांधी, श्वेता पवार.
संघव्यवस्थापक : सलीम खान.