आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी विशेष सभा बोलावली, समांतर जलवाहिनीचा ठराव बदलण्याचा विषय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - उजनी ते सोलापूर दरम्यानच्या समांतर जलवाहिनीबाबतचा ठराव बदलण्यासाठी महापौर सुशीला आबुटे यांनी शुक्रवारी (१८ मार्च) विशेष सभा बोलवली आहे. १२४० कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही योजना महापालिकेने करावी, असा ठराव महापालिकेने बहुमताने घेतला होता. परंतु, समांतर जलवाहिनी योजना करण्यासाठी महापालिकेकडे कार्यकारी अभियंता, विद्युत आणि यांत्रिकी कामासाठी कार्यकारी अभियंता नाहीत. त्यामुळे ही योजना जीवन प्राधिकरणकडून करून घ्यावी, असे विभागीय आयुक्तांनी सुचवले होते. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी प्रस्ताव दिला आहे.

एनटीपीसीची २५० कोटींची रक्कम मजिप्रा किंवा शासनाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव आहे. एनटीपीसी २५० काेटी रुपये एकदम देणार का? एनटीपीसीची रक्कम या योजनेसाठी मनपा हिस्सा म्हणून दाखवता येईल का? आदी प्रश्न उपस्थित होणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या सभेत चर्चा अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...