आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामांच्या स्मरणार्थ शिक्षकांना पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कारांतील विशेष शिक्षक पुरस्कार यंदाच्या वर्षीपासून दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे. शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत असून २५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव लोकमंगल फाउंडेशनकडे पाठवावे, असे आवाहन अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

"लोकमंगल'च्या वतीने २००७ पासून शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात येतो. दोन हजार रुपयांचे ग्रंथ, स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी सविस्तर माहितीसह जुना पुना नाका येथील लोकमंगल हाऊस येथे स्वत: किंवा टपालाद्वारे अर्ज पाठवावेत. अर्जासोबत मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे.' या पत्रकार परिषदेस शहाजी पवार, अलका साठे, डॉ. आशालता जगताप, वासुदेव तडवळकर, निर्मला कुंभार, प्रा. विलास मोरे आदी उपस्थित होते.