आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकी वारीसाठी विशेष रेल्वे धावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे प्रशासनाने कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या हेतूने अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेसह दक्षिण मध्य रेल्वेच्या गाड्या पंढरपूरसाठी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
लातूर -पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१४८९ ही ते १४ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहे. लातूर रेल्वे स्थानकावरून रोज सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी ही गाडी निघेल. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी पंढरपूरला पोहचेल. तर गाडी क्रमांक ०१४९० ही दिनांक ते १४ नोव्हेंबर दरम्यान धावेल. पंढरपूर रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी दोन वाजता सुटेल. लातूरला सायंकाळी सात वाजता पोहचेल. गाडीस औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी, मोडनिंब अादी स्थानकांवर थांबा देण्यात आला. या गाडीला सहा आरक्षित सहा अनारक्षित डबे जोडण्यात आले.

मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक ०१४८७ ही ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहे. मिरज स्थानकावरून रोज दुपारी वाजून ३५ मिनिटांनी निघेल. पंढरपूरला सायंकाळी वाजून १० मिनिटांनी पोहचेल. तर गाडी क्रमांक ०१४८८ ही गाडी ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान धावेल. पंढरपूर स्थानकावरून रोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. मिरजला दुपारी वाजून २० मिनिटांनी पोहचेल. गाडीस सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगर आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला. या गाडीला सात अनारक्षित दोन आरक्षित डबे जोडण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष गाडी सोडण्यात येत आहे. पंढरपूर -नांदेड विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०७५२४ ही ११ नोव्हेंबर रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी वाजता सुटेल. नांदेडला रात्री वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल. तर गाडी क्रमांक ०७५२४ ही १५ नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी वाजून २५ मिनिटांनी निघेल. पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहचेल. गाडीस पूर्णा, परभणी, गंगा खेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन आणि कुर्डवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...