आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवेसाठी स्पाइस जेटच्या हालचाली सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत छोट्या शहरांना विमान वाहतुकीने जोडण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विमान सेवा देणाऱ्या कंपन्याही पुढे येताना दिसत आहेत. स्पाइस जेट कंपनी सोलापूरहून विमान सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. त्या दृष्टीने कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनी सोलापूरसाठी तीन मार्गांचा विचार करत आहे. यात मुंबई - सोलापूर - हैदराबाद, मुंबई - सोलापूर - नागपूर आणि बीदर - सोलापूर - नवी दिल्ली हे मार्ग आहेत.

पाच वर्षांपूर्वी किंगफिशर एअरलाइन्सची सोलापूरसाठीची विमानसेवा बंद झाली. त्यानंतर ती सुरू होऊ शकलेेली नाही. स्पाइस जेट ही हवाई क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. कंपनीकडे ७८ आसनी दोन विमान उपलब्ध आहेत. सीट संख्या जास्त असल्याने तुलनेने याचे दर कमी असतील, अशी शक्यता आहे.
सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. या माध्यमातून सोलापूरला दोन ते तीन शहरांना जोडण्याचा विचार आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सध्या लंडन येथे आहेत. ते मुंबईत परतल्यानंतर अधिक बोलता येईल. संदीप घाटे, सल्लागार मंडळ, स्पाइस जेट
बातम्या आणखी आहेत...