आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आमदार रमेश कदम यांची ५० कोटींची मालमत्ता सील करा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात सुमारे ३०० कोटींचा घोटाळा केल्याचा अाराेप असलेले महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष व माेहाेळ (जि. साेलापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि इतरांची ५० कोटी रुपयांची मालमत्ता सील करा, असे आदेश विशेष मनी लाँडरिंग न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

या घाेटाळ्याबाबत कदम यांना गेल्या वर्षी पुण्यातून अटक करण्यात अाली हाेती. ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ दरम्यान कदम हे महामंडळाचे अध्यक्ष होते. या काळात महामंडळात अर्थिक घोटाळा झाला. तसेच पुराव्याआधारे कदम आणि इतरांनी मनी लाँडरिंगअंतर्गत मालमत्ता खरेदी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश िवशेष न्यायालयाचे सदस्य तुषार शहा यांनी दिले. न्यायालयाच्या अादेशानुसार कदम यांचा मुंबईतील फ्लॅट, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमीन आणि बँक खात्यातील रोकड असे मिळून ५० कोटींची मालमत्ता सील करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...