आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाणी आणि अन्नातून काविळीच्या विषाणूचा प्रसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कावीळहा आजार व्हायरल हेपॅटायटिस मुख्यत अ, ब, क, ड, ई, या विषाणू प्रकारामुळे होतो. भारतामध्ये प्रत्येक शंभरामागे पाच ते सात लोकांना प्रत्येकवर्षी या विषाणूची लागण होत असते. या विषाणू प्रकारापैकी कावीळ-अ आणि कावीळ यांचा प्रसार दूषित पाणी आणि अन्नातून होतो. तर कावीळ ब, आणि या प्रकारचा कावीळ संक्रमित रक्त किंवा रक्तघटक, गोंदण, निर्जंतुकीकरण केलेल्या सुयांमुळे होतो. निर्जंतुकीकरण केलेले पाणीच पिण्यास वापरावे. अन्न पाण्याबाबत पुरेशी स्वच्छता बाळगावी.
सर्वसाधारण लक्षणे
विषाणूचासंसर्ग झाल्यानंतर एक ते सहा महिन्यात लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. यास अधिशयन काळ म्हणतात. आजाराची सुरुवात प्रामुख्याने मळमळ होणे, उलट्या होणे, भूक लागणे, ताप येणे इत्यादी होते. तसेच लघवीचा रंग पिवळा होतो. नखे डोळेही पिवळसर पडतात. बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार बरा होतो. मात्र कावीळ आणि प्रकारामध्ये काही रुग्णास यकृताचा आजार किंवा यकृताचा कॅन्सर होऊ शकतो.

^ कावीळ होऊ नये याकरिता असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत. नोंदणीकृत रक्तपेढीतून रक्त घ्यावे. कावीळ होऊ नये याकरिता सर्व शासकीय आरोग्यकेंद्रात प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ही लस नवजात अर्भकास पहिल्या दिवशी दिली जाते नंतर वयाच्या सहा, दहा आणि चौदाव्या वर्षी आठवड्यानंतर प्रत्येकी एक मात्रा दिली जाते. डॉ.प्रताप शिंदे, डॉ. व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अन्नऔषधी वैद्यकशास्त्र.

प्रतिबंध उपचार : कावीळया विकाराला कोणतेही खास औषधे नाहीत. पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. पातळ भात, चपाती, भाकरी, तूप किंवा तेल लावता केलेली चपाती खाणे उत्तम. साय काढलेले दूध, फळभाज्या, पालेभाज्या, फळे घेण्यास हरकत नाही. अंडे, मटण, तळलेले पदार्थ टाळावेत.

दूषित पाणी आणि अन्नातून काविळीच्या विषाणूचा प्रसार