आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय माहितीसाठी "सरल’चा होणार वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्वमाध्यमांच्या शाळांसह शकि्षक, शकि्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सरल (सिस्टिमॅटकि अॅडमिन्ट्रकि रिफॉर्म्स फॉर अचिव्हमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट) ही प्रणाली वकिसित करण्यात आली आहे. यूडायसपेक्षा सरस असलेल्या या प्रणालीच्या माध्यमातून माहितीचे संकलन होणार आहे.

मागवलेली विविध प्रकारची माहिती संकलित करताना शकि्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, लिपकि तसेच शकि्षण विभागातील अधिका-यांचा वेळ वाया जातो. त्याचा अध्ययन, अध्यापनावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सरल ही प्रणाली वकिसित करण्यात आली आहे.
यूडायस प्रणालीत केवळ सांख्यिक माहितीचा समावेश करण्यात येत होता. सरल प्रणालीत व्यवस्थापनाचा प्रकार, पत्ता, शाळेत असलेल्या सुविधा, मिळालेले अनुदान, त्याचा होणारा विनियोग, शाळेत असलेल्या विविध प्रकारच्या समित्या, त्यातील तपशील, आरटीईमधील तरतुदी, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शैक्षणकि साहित्याचा पुरवठा, दुर्बल घटक वंचित गटातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची माहिती, खेळाचे पटांगण साहित्याची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था, वर्ग तुकडीनिहाय वेळापत्रक, विषय, शैक्षणकि शुल्क, बँक खात्याचा तपशील आदी माहिती संकलित करता येणार आहे. सेवापुस्तके ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
इत्थंभूत माहिती: ‘सरल’प्रणालीत विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसह ऑनलाइन प्रगती पुस्तक उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन उपलब्ध होणार आहे.

दाखल्याचे ऑनलाइन हस्तांतरण : गळतीचेरोखण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा पुढील महाविद्यालयात ऑनलाइन देण्यात येईल. राज्याबाहेर प्रवेश घेतल्यास खात्री झाल्यानंतर अधकिाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीने पालकांकडे देण्यात येईल.

वेळ वाचणार : शालेयस्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी ‘सरल’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रणालीचा यंत्रणेकडून योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे. तसे झाले तरच प्रणालीचा उपयोग होईल.
प्रशकि्षण देण्यात येईल

‘सरल’बाबत राज्य जिल्हास्तरीय प्रशकि्षणाची मोहीम झाली. १० जुलैला तालुकास्तरीय प्रशकि्षण देण्यात येईल. १५ ऑगस्टपर्यंत सर्व शाळांची माहिती त्यावर भरण्यात येणार आहे.” राजेंद्रबाबर, प्राथमकि शकि्षणाधिकारी, जिल्हा परिषद