आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी स्थानकाच्या नूतनीकरण, रस्ते कामाची चौकशी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एसटीबस स्थानकाचे नूतनीकरण आणि अंतर्गत रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
मागील वर्षी सुमारे ९० लाख रुपये खर्चून कामे झाली होती. मात्र, वर्षभरातच डांबरीकरणाची खडी उखडून खड्डे पडले असल्याने आवारात पावसाचे पाणी साचून तळे झाले आहे. याविषयीचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते.

सोलापूर एसटी विभाग झालेल्या कामांचा अहवाल लवकरच मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविणार आहे. तसेच कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडून झालेल्या कामाची चौकशी होणार आहे. यात मक्तेदार दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तूर्त तरी संबंधित मक्तेदाराचे सेक्युरिटी डिपॉझीट एसटीने आपल्या ताब्यात ठेवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नूतनीकरणाचे काम यश कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. यात प्लोअरिंग, ग्रॅनाईट बसविणे, पेंटिंग, फलाटाची उंची वाढविणे आदी कामांसह छताला वॉटर प्रुफिंग करणे ही कामे ठरली होती. वॉटर प्रुफिंग झाले असले तरी यंदाच्या पावसाळ्यात बसस्थानक गळके झाल्याचे निदर्शनास आले. आऊट गेटच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने तेथे पाण्याचे तळे साचले होते. अंतर्गत रस्त्याचे काम २०१३ -१४ मध्ये व्ही. आर. भट्टड या मक्तेदाराने केले. त्यांच्याही कामाची चौकशी केली जाणार आहे.

दोषींवर कारवाई
^स्थानकाच्या नूतनीकरणाचे रस्त्याचे काम दोन मक्तेदारांना देण्यात आले होते. त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविला जाईल. तसेच त्यांनी केलेल्या कामाची चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई केली जाईल.” श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...