आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागच्याच वर्षी रस्ता केला, ‘स्थायी’त पुन्हा विषय आला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान याेजना (जिल्हास्तर) अंतर्गत रस्त्याच्या कामांचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आला. त्यात एक रस्ता मागील वर्षातच केलेला होता. योजनेसाठी किमान पाच वर्षांपूर्वी झालेला रस्ता निवडणे अपेक्षित होते. त्यामुळे सर्व रस्त्यांची चौकशी करून प्रस्ताव फेर सादर करण्यास प्रशासनास सांगण्यात आले.
शुक्रवारी स्थायी समितीची सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
शहरातील ४९ रस्ते कामाची निविदा काढून ती मंजुरीसाठी ‘स्थायी’कडे पाठवली होती. त्यास नगरसेवक सुरेश पाटील आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली. त्यावर दोन तास चर्चा झाली. काही रस्ते निकषानुसार निवड झालेले नाहीत. पाच वर्षांपूर्वीचे रस्ते घेण्याचे ठरले असताना घोंगडे वस्ती येथे एक रस्ता अलीकडील काळात झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व ४९ रस्त्यांची चौकशी करून १५ दिवसांत फेरसादर करण्याचे आदेश सभापती काळे यांनी नगर अभियंता कार्यालयास दिले.

योजनेसाठी महापालिकेकडून ६० कोटींच्या ५८० रस्त्यांची कामे सरकारकडे सादर केली. या योजनेत शासकीय अनुदान ५० तर महापालिकेचे अनुदान ५० टक्के असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या नाजूक, आर्थिक स्थितीमुळे ३० कोटी भरता आले नाहीत. १० कोटी २४ लाखांची कामे सरकारने मंजूर केली. यात महापालिका कोटी १२ लाख तर सरकार कोटी १२ लाख देणार आहे. यासाठी १८ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४९ कामे मंजूर करण्यात आली. हे मंजूर करत असताना पाच वर्षांपूर्वीचे रस्ते असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.

- मंडईतील मटन विक्री परवाना २०० रुपयांनी वाढवला
- मंडईतील फी मध्ये दोन ते पाच रुपये वाढ
- महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सीसीटीव्ही, जेवणाच्या बिलास हरकत, विषय फेरसादर होणार

घोंगडे वस्तीचा रस्ता मागील वर्षातील
घोंगडेवस्ती येथे साई गणेश मंदिर ते शंकर मित्रमंडळपर्यंत रस्ता अलीकडील असताना तेथील कामाचा समावेश होता. याबाबत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे ४९ रस्त्यांची चौकशी करून विषय फेरसादर करावा, असा आदेश सभापती काळे यांनी दिला.
एक रस्ता झाला

स्थायीसमितीसमोर असलेल्या यादीत नगरसेवक सुरेश पाटील आनंद चंदनशिवे यांनी सांगितलेला रस्ता नव्हता. पण ४९ रस्त्याच्या यादीत मागील वर्षातील एक रस्ता आहे. स्थायीने चौकशी करून विषय फेरसादर करण्याचे आदेश िदले त्यानुसार चौकशी करून अहवाल देऊ.” लक्ष्मणचलवादी, प्रभारी नगर अभियंता, महापालिका
बातम्या आणखी आहेत...