आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा मक्ता काढता काम सुरू, कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील कचरा उचलण्यासाठी मक्ता काढताच आवश्यक बाब म्हणून मक्तेदारांना मुदतवाढ देऊन काम सुरू करण्यात आले. याशिवाय पुन्हा नवीन चार मक्तेदार नेमण्याची घाई महापालिका करत आहे. अशा प्रकारे नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आली.

महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. नवीन चार कचरा मक्तेदार नेमण्याचा विषय स्थायी समितीकडे आला होता. त्यावर एक तास चर्चा झाली. त्यानंतर विषय फेरसादर करण्याचे आदेश दिले. मागील वर्षी मकर संक्रांत पूर्वी समिक्षा कंपनीचा कचरा उचलण्याचा मक्ता रद्द करून नवीन पाच मक्तेदार नेमण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अत्यावश्यक बाब म्हणून तीन महिन्यांसाठी मक्तेदार नेमले होते. तीन महिन्यांनंतर प्रक्रिया करण्याऐवजी त्या मक्तेदारांना मुदतवाढ दिली.
मक्ता दिला कसा
टेंडर प्रक्रिया करून निविदा काढणे आवश्यक आहे. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे बेकायदेशीर काम करणारे सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे यांच्यावर कारवाईची मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली. दरम्यान नियमानुसार काम केल्याचे सांगत सहाय्यक आयुक्त साठे यांनी सर्व आरोप फेटाळले.

हे आहेत नवीन मक्तेदार

१- लक्ष्मण केत
२- धर्मराज कस्ट्रक्शन
३- जिजाई कस्ट्रक्शन
४- आदित्य एंटरप्रायजेस
वारंवार मुदतवाढ
जानेवारी २०१५ मध्ये अत्यावश्यक बाब म्हणून पाच मक्तेदारांची तातडीने नेमणूक केली. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये निविदा काढून प्रक्रियेअंती मक्तेदारांना काम देणे आवश्यक असताना दर तीन महिन्यांनी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरवेळी मुदतवाढ कशासाठी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...