आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलिनीकरणानंतर हैदराबाद बँकेची शाखा बंद; स्टेट बँकेच्या वाशी शाखेत वाढली गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशी - स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेचे भारतीय स्टेट बँक शाखेत विलिनीकरणानंतर सोमवारी (दि.११) पहिल्याच दिवशी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दरम्यान, हैदराबाद बँकेची बंद केलेली शाखा पुन्हा सुरू करण्याची मागणीही होत आहे. 
 
शहरात दोन्ही बँकांची मिळून ५०-६० हजार ग्राहकसंख्या आहे. विलिनीकरणानंतर येथील एसबीआयची ग्राहकसंख्या वाढल्याने बँक शाखेत सोमवारी गर्दी दिसून आली. शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास आहे. तसेच येथे आर्थिक व्यवहारासाठी तालुक्यातून ग्रामस्थांची रेलचेल असते. त्यामुळे बँकेची ग्राहकसंख्याही अधिक आहे. यामुळे एसबीआयची ग्राहकसंख्या वाढल्याने बँक व्यवहाराची प्रक्रिया वेळखाऊ बनल्याची नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, येथील काही नागरिकांनी स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा सुरू ठेवण्याची मागणी केली होती. आमदार राहुल मोटे यांनीही यासंदर्भात बँक प्रशासनाला पत्र लिहून एसबीएचची शाखा सुरूच ठेवण्याची मागणी विभागीय कार्यालयाकडे केली होती. 
 
राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा : स्टेटबँक ऑफ हैदराबाद शाखेचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत विलिनीकरण झाल्यानंतर एसबीएच ची शाखा बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद केलेली शाखा सुरू करावी. अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन करणार, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर मच्छिंद्र कवडे, विकास पवार, सूर्यकांत सांडसे, अमर देशमुख, अजिंक्य उंदरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत. 
 
व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी 
व्यापाऱ्यांची खाती स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत होती. दोन्ही बँकांचे व्यवहार एकाच ठिकाणी सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. व्यवहार गतीने होण्यासाठी स्वत्रंत्र व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...