आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State EGS Works Of Irregularities; Collector Kalamb Patil Suspended

रोहयो गैरव्यवहार; कळंबच्या तहसीलदार पाटील निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - येथील तहसीलदार वैशाली पाटील यांना रोजगार हमी योजनेतील गंभीर अनियमिततेप्रकरणी प्राथमिक स्तरावर दोषी आढळून आल्याने निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निलंबनाचा तडाखा दिला असून या कारवाईमुळे प्रशासनासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेली अनेक कामे वादग्रस्त ठरली आहेत. तालुकाभरातून कामांबाबत तक्रारी येत असताना दुसरीकडे तहसील कार्यालय पातळीवर अशा तक्रारींची चौकशी करून सत्य समोर आणण्याएेवजी संबंधित कामांचे बिल अदा केले जात होते. परंतु, हे बिल अदा करताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच तहसीलदार वैशाली पाटील यांच्या काळातील महाराष्ट्र रोजगार हमीच्या कामाची चौकशी करावी या मागणीकरता शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंदोलन करण्यात आले होते. त्याचबरोबर रोहयोंच्या कामाबाबत ग्रामीण पातळीवरून तक्रारी वाढल्यानंतर लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिका-यांनीही तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी वैशाली पाटील यांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी कळंबच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निलंबित केल्याचे आदेश सोमवारी (दि.१३)दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माझ्यावर ठेवलेले आरोप पूर्ण चुकीचे आहेत. परंतु, वरिष्ठांचा निर्णय मान्य करावा लागेल. निलंबित करताना कोणतीही कारणे दाखवा नोटीस दिलेली नाही. रोहयोच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.'' वैशाली पाटील, तहसीलदार (निलंबित)