आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारएनए इव्हेंट्सचे राज्यस्तरीय प्रदर्शन, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर: सोलापूर चौथा राज्यस्तरीय वॉव (वर्ल्ड अाॅफ वुमनहूड) महोत्सव येत्या जानेवारीपासून होम मैदानावर होणार अाहे. विविध वस्तूंच्या प्रदर्शनासह महिलांसाठी स्पर्धांचेही अायोजन करण्यात अाले अाहे. अादर्श महिला मंडळ स्पर्धाही होईल. या महोत्सवात प्रदर्शन, विक्री, स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अाल्याची माहिती महोत्सवाच्या अायोजक राही होमकर-आरसीद यांनी दिली. 
 
गेल्या चार वर्षांपासून हा महोत्सव सोलापुरात होत अाहे. गेल्यावर्षी लातूर येथेही हा महोत्सव पार पडला. होम मैदानावर ६, जानेवारी रोजी हा महोत्सव होत अाहे. 

विविध प्रकारचे ३५ स्टाॅल महोत्सवात असतील. गेल्या वर्षी तीन दिवसांत या महोत्सवाला ३० हजार जणांनी भेट दिली होती. मराठीतील तारका शर्मिष्ठा राऊत यांच्या हस्ते समारोप झाला होता. 
 
यावर्षीही प्रदर्शनाबरोबर विविध उपक्रमांचे अायोजन करण्यात अाले अाहे. त्यात विविध गुणदर्शन स्पर्धा, सिनेतारकांबरोबर गप्पा-टप्पा, अारोग्यविषयक जनजागृती, अारोग्य तपासणी, रक्तदान नेत्रदान शिबिर यांचा समावेश अाहे.
 
विशेष म्हणजे या वेळी निसर्ग छायाचित्रकार शिवाई शेळके यांच्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवात होणार अाहे. अादर्श महिला मंडळ स्पर्धेसाठी अर्ज मागवले जात अाहेत. इच्छुकांनी अारएनए इव्हेंट्स, रोटे काॅम्प्लेक्स, लष्कर या ठिकाणी संपर्क साधावा, असे अावाहनही अरसीद यांनी केले अाहे. 
 
स्पर्धांचे अायोजन 6 जानेवारी रोजी ती...
वर्किंग वूमन या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच उखाणे, होम मिनिस्टर ब्रायडल मेकअप स्पर्धा, जानेवारी पाककला, फ्लाॅवर डेकोरेशन, होम मिनिस्टर स्पर्धा, जानेवारी रोजी मेंदी, एकल, युगल नृत्य, गीत गायन अादर्श महिला मंडळ अशा स्पर्धा होतील. या स्पर्धांचे पुरस्कार वितरण समारोपावेळी प्रदर्शनातच होणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...