आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदुपारी रिक्षातून दारू नेताना कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अशोक चौक ते गुरुनानक चौक रस्त्यावर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक करताना मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. ३६० लिटर दारूसह ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रिक्षातून (एमएच १३, जी ५८८९) हातभट्टी दारूची वाहतूक करताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु, ही कारवाई करताना रिक्षा चालक फरार झाला. ही कारवाई उपअधीक्षक सागर धोमकर, निरीक्षक समीर पाटील, रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मनीषा मिसाळ, मोहन जाधव, गजानन होळकर, गणेश सुळे, निशांत मिसाळ यांनी केली.