आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री सदा खाेतांच्या खांद्यावर भाजपचे उपरणे, राजू शेट्टींच्या भूमिकेला फासला हरताळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- ‘जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या पालखीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खांदा देणार नाहीत,’ अशी घाेषणा करणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टींच्या भूमिकेविराेधात त्यांच्याच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राज्यमंत्री सदाशिव खाेत वागत असल्याचे दिसते.
 
सांगली जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत खाेत व्यासपीठावर विराजमानही झाले हाेते. इतकेच नव्हे, तर त्यांनी ‘कमळ’ चिन्ह असलेले भाजपचे उपरणेही गळ्यात घातले हाेते.   

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी हाेऊन खासदार राजू शेट्टी व सदा खाेत यांनी राज्यात भाजपची सत्ता अाणण्यात खारीचा का हाेईना वाटा उचलला. मात्र, सत्तारूढ झाल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले. त्याअाधी भाजप सत्तेत सहभागी करून घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे व शेतकरी हिताची भूमिका घेत नसल्यामुळे खाेत व शेट्टी दाेघेही नाराज हाेते. मात्र, दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांनी खाेत यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लावून त्यांना अापल्या गाेटात खेचून घेतले.  
 
मात्र, मंत्रिपद मिळाल्यापासून खाेत यांच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी व्यक्त हाेत अाहे. खुद्द राजू शेट्टीही खाेतांवर नाराज अाहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच त्यांनी ही नाराजी बाेलूनही दाखवली. तसेच खाेतांनी अापल्या मुलाला निवडणुकीची उमेदवारी देऊन संघटनेत ‘घराणेशाही’ अाणल्याचेही शेट्टींना पटलेले नाही.  भाजप अामच्या संघटनेत फूट पाडत अाहे, त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला हाेता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी खाेत यांनी राजू शेट्टींनी केलेल्या अाराेपाचे खंडन करत अापण भाजपच्या प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले हाेते. त्यानुसार सांगलीत गुरुवारी भाजपच्या सभेत खाेतांनी हजेरी लावली.   
 
भाजपच्या नेतृत्वाला गर्व चढलाय : शेट्टी  
भाजपवर नाराज असलेल्या नाराज असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी पुणे, नाशिक व पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत भाजपची साथ साेडून चक्क शिवसेनेला पाठिंबा दिला अाहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेपाठाेपाठ अाम्हीही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी दिला अाहे. दरम्यान, भाजपच्या राज्यातील नव्या नेतृत्वाला सत्तेचा गर्व चढला अाहे. अामचा पक्ष वाढविण्यासाठी अाम्ही समर्थ अाहाेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेट्टींनी व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...