आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित पाणी देता येत नाही, स्मार्ट सिटीची फुशारकी कशाला; असदुद्दीन ओवेसी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या ५० वर्षांपासून महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आतापर्यंत नागरिक केवळ दैनंदिन सुविधांचीच मागणी करत आहेत. एका बाजूने पाणी दिले जात नाही आणि दुसऱ्या बाजूने स्मार्ट सिटीच्या फुशारक्या मारल्या जात आहेत. एमआयएमला एकदा संधी द्या, विकास कसा असतो ते दाखवून देऊ. तक्रार करण्याची वेळ नागरिकांवर येऊ देणार नाही, असे आवाहन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी दोन वाजता होम मैदान येथे मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होती. सभेस तब्बल दोन तास सभेस विलंब झाला. 

खासदार ओवेसी म्हणाले, सोलापूर शहरात रस्त्याचे, ड्रेनेजचे काम पूर्ण झाले नाही. युजर चार्जेस विनाकारण वसूल केले जात आहेत. मुबलक पाणी असूनही चार दिवसांआड पाणी दिले जाते. दररोज १४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करून चार दिवसांआड पाणी दिले जाते. मग उर्वरित पाणी कुठे जाते. नियोजनाअभावी कोट्यवधी रुपयांचा निधी परत गेला. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे बजेट जाते कुठे? रमाई आवास योजना अद्याप अपूर्ण आहे. १४० मधील ९० बसेसची चेसी खराब आहेत. अशा प्रकारे महापालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक असतील तर प्रशासनावर कसा अंकुश ठेवायचा, त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायची, लोकांना सुविधा कशा पुरवायच्या हे दाखवून देतील. 
 
शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन अब्दुल्ला डोणगावकर यांनी तर आभार कोमारो सय्यद यांनी मानले. या वेळी व्यासपीठावर सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. रखरखत्या उन्हातही तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भाषण संपल्यावर श्री. ओवेसी यांनी एमआयएमला मत देणार ना, असा प्रश्न केला. त्यावर हात उंचावून सर्वांनी नारा देत होकार भरला. 

ते पळालेच नव्हते 
सोलापूरच्या एका तरुणासह काही तरुण भोपाळ तुरुंगात होते. ते पळाले म्हणून त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला. तो प्रकार बनावट होता. ३० फूट उंच भिंत ते चढले कसे आणि उतरले कसे, त्यांच्याकडे कपडे कसे आले, त्यांना पकडण्याऐवजी मारले का? आदी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रकरणाची चौकशी अद्याप केली गेली नाही. 

असीमानंद प्रकरणी सुशीलकुमार यांच्याकडून नाही प्रतिसाद 
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे मुस्लिमांवर झालेल्या अत्याचार झाल्याच्या प्रकरणावर कॉँग्रेस मूग गिळून गप्प का? मालेगाव स्फोटातील आरोपी असीमानंद यांचा जामीन रद्द करण्यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे दार का ठोठावले नाही? मी सुशीलकुमार िशंदे यांना दोन वेळा फोन केला होता. पण प्रतिसाद मिळाला नाही. ऐन निवडणुकीत केवळ धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा काँग्रेसकडून पिटला जातो. भाजपची सत्ता आली आणि ते प्रकरणच थंड झाले. आघाडी आणि युती दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांनी कधीही अल्पसंख्याक विकासाचा विचार केलाच नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...