आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपात सहकारक्षेत्र वाढतोय, देशात खासगीकरणाची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - युरोपखंडात सहकारी बँका वाढत आहेत. जगाची आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गत आर्थिक वर्षात २० टक्क्यांनी या बँका वाढल्याचे दिसून आले. आफ्रिका खंडातल्या केनियामध्ये ४५ टक्के बँका या सहकारी आहेत. जगभरात अशी स्थिती असताना भारतात मात्र त्यांच्या खासगीकरणाची चर्चा होते. ते हाणून पाडण्यासाठी रिझर्व्ह बँक, नीती आयोग, केंद्रीय अर्थमंत्र्यांपुढे भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे (पुणे) यांनी येथे सांगितले.

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीने आयोजित राज्यव्यापी सहकार परिषदेत ते बाेलत होते. ‘परदेशातील सहकारी बँsolapur, का : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, “१०० कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या नागरी सहकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा विचार रिझर्व्ह बँकेचा आहे. देशातील १६०० बँकांपैकी समारे ८०० बँकांची उलाढाल १०० कोटींच्या वर अाहे. म्हणजे निम्म्या बँकांचे खासगीकरण करण्याचा हा विचार सहकार कुठे नेतो? खासगी आणि व्यावसायिक बँकांपेक्षाही सहकारी बँकांचे काम प्रभावी आहे. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे तेच माध्यम आहे. त्याकडे खासगीकरणाच्या चष्म्यातून पाहणे म्हणजे सर्वसामान्यांवर अन्याय होईल.”

होटगी रस्त्यावरील हेरिटेज लॉनमध्ये या परिषदेस सुरुवात झाली. बँकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळ खासदार अॅड. शरद बनसोडे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष प्रा. गजानन धरणे,संचालक सदाशिव दाते, मुकुंद देवधर, भूपती सामलेटी, अशोक सरवदे, संजय चाबुकस्वार, सुहास श्रीगोंदेकर, अॅड. प्रदीपसिंह रजपूत, नितीन कोटेचा, मुकुंद कुलकर्णी, प्रमोद भुतडा, डॉ. किरण पाठक, अरुण दुधाट आदी उपस्थित होते.

लाखांचा विमा हवा
^सहकारी बँकांतीलअडचणींसंदर्भात आरबीआयचे उपगव्हर्नर सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात नियमित बैठका होतात. ठेवींना मिळणारी विमा रकमेची मर्यादा लाखांपर्यंत वाढवण्याची आग्रही मागणी अाहे. ती येत्या सोमवारच्या बैठकीत मान्य होण्याची शक्यता अाहे. ते झाल्यास नागरी सहकारी बँकांतील ठेवींची सुरक्षितता वाढेल. शिवाय ठेवरकमाही वाढतील.” चंद्रकांत दळवी, सहकारआयुक्त

मनुष्यबळ विकास हवे
^सहकारी बँकांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्याचा विचार करता मनुष्यबळ विकास विभाग सुरू करण्याची गरज आहे. आधुनिक बँकिंगमधील तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याचा विचार अाहे. त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन उमेदवारांची निवड करावी. ही यंत्रणा केंद्रिभूत करून प्रशिक्षण द्यावे अाणि तयार मनुष्यबळ सहकार बँकांना देण्याचे नियोजन करण्याचा विचार करतो आहोत.” शेखर चरेगांवकर, राज्यसहकार परिषदेचे अध्यक्ष

आज समारोपात
Áसकाळी१० वाजता : मनुष्यबळ विकास तंत्रज्ञान : दिलीप टिकले
Áसकाळी ११.३० वाजता : सहकार कायदा : अॅड. उदय वारुंजीकर
Áदुपारी १२ वाजता : नागरी बँकांच्या व्यावसायिक अडचणीवर प्रस्ताव
Áदुपारी २.३० वाजता : सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समारोप
सतीश मराठे


बातम्या आणखी आहेत...