आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालदिन विशेष: या शाळेत एका क्लिकने अभ्यास पोहोचतो विद्यार्थ्यांच्या घरी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पापरी (सोलापूर)- एका क्लिकने अभ्यास पोहोचतो विद्यार्थ्यांच्या घरी... इंगोले वस्ती डिजिटल शाळेतील शिक्षकाचा या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मुलांनी कोणता अभ्यास करावा किंवा ते कोणता अभ्यास करत आहेत, हे थेट पालकांना या उपक्रमामुळे समजते. तसेच गैहजर विद्यार्थ्यालाही आदल्या दिवशी सांगितलेला अभ्यासही करता येतो.
 बालदिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी सोलापूर जिल्हातील खास डिजिटल शाळेची माहिती घेऊन आलो आहे.

खंडाळी (ता.मोहोळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा इंगोले वस्तीचे उपक्रमशील शिक्षक रवी चव्हाण यांनी दररोज अभ्यासाचा संदेश पालकांच्या मोबाइलवर पाठवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून शाळेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे पालकांना दररोज शिक्षकांनी कोणता अभ्यास सांगितला, हे मोबाइलवर पाहता येते. शाळेच्या या नवीन उपक्रमाबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त केले आहे.

आधी तोंडी सांगितलेला अभ्यास विद्यार्थ्यांना लक्ष्यात राहत नव्हता. त्यामुळे घरी नेमका कोणता अभ्यास करायचा आणि पालकांनी करवून घ्यायचा, हेही लक्षात येत नव्हते. काही वेळा गैरहजर विद्यार्थी दुसऱ्या दिवशी अभ्यास न करता येत होते. त्यासाठी रवी चव्हाण यांनी यावर एक उपाय म्हणून ऑगस्ट महिन्यापासून मोबाइलद्वारे टेक्स्ट मॅसेज पाठवणे सुरू केले.

असा बनवला एक ग्रुप...
सर्व पालकांचे फोन नंबर संग्रहित करून पहिली आणि चौथीचा ग्रुप तयार करून दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर उद्याच्या अभ्यासाचा संदेश लिहून पाठवायला सुरूवात केली.एका क्लीक ने मराठीत लिहलेला अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचू लागला. त्यामुळे विदयार्थी आणि पालक दोघांना नेमका अभ्यास आज कोणता करायचा हे समजू लागले. पालकही मुलांकडून अभ्यास करवून घेऊ लागले. अश्याप्रकारे आधुनिक पद्धतीद्वारे अभ्यास संदेश सेवा सुरू झाली. या उपक्रमास पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अभ्यासाशिवाय शाळेत असलेले कार्यक्रम, मीटिंग, निरोप, परीक्षा वेळापत्रक पालकांना पोहोचवणे सोपे झाले आहे. दररोज पालक आणि विद्यार्थी मॅसेजची वाट पाहत असतात.

या अभ्यास मॅसेज मध्ये शुद्धलेखन, पाढे, गणिते, स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, पाठांतर, चित्र, इंग्रजी शब्द पाठ करणे, पुस्तक वाचन आणि इतर अनेक वेगळ्या अभ्यासाचा समावेश असतो. घोकंपट्टीच्या अभ्यासापेक्षा मनोरंजक पद्धतीचा अभ्यास सुरू झाला आहे. शिक्षक आणि पालक यांचे जवळचे संबंध यामुळे तयार झाले असल्याचे रवी चव्हाण यांनी सांगितले. व्हॉट्सअॅपमध्ये ही शाळेचा ग्रुप तयार केला असून त्यात पालक आणि माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ आणि इतर शाळेतील शिक्षक समाविष्ठ आहेत. शाळेतील उपक्रमाचे दररोज माहिती त्यामधून दिली जाते. परंतु सर्व पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसतो. टेक्स्ट मॅसेज वापरून संदेश पाठवणेही सुरू केले आहे. शाळेत सध्या 89 पट आहे. विदयार्थी टॅब हाताळतात. शाळा संपूर्ण सोलर युक्त डिजिटल आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांनी केली प्रशंसा..
शिक्षण विभाग मोहोळचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्तार अधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख सौदागर चव्हाण, प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, सर फाउंडेशनचे राज्य समन्यवक सिद्धाराम माशाळे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
 
काय सांगतात विद्यार्थी...
'सरांनी पाठवलेला अभ्यासाचा मॅसेज माझ्या टॅबवर दररोज येतो. मला अभ्यास घरी करणे सोपे झाले आहे. सर्व अभ्यास लक्षातही राहतो.'
- साक्षी सिद्धेश्वर भोसले, इयत्ता- चौथी

'आधी माझा मुलगा आदित्य राऊत (इयत्ता चौथी) घरी आल्यावर थोडासा अभ्यास करून झाला असे सांगत होता. पण सरांच्या मॅसेज मुळे आम्हाला त्याचा अभ्यास पाहता येऊ लागला आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला का हे पाहणे शक्य झाले. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामुळेच मी माझ्या मुलांना इंगोले वस्ती शाळेत प्रवेश घेतला आहे.'
- दत्तात्रय बाबासाहेब राऊत, पालक

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... इंगोले वस्ती डिजिटल शाळेतील स्मार्ट विद्यार्थ्यांचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...