आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२१ बंदरे जोडणार, मालवाहतुकीला येणार गती, २० हजार कोटींंचा खर्च अपेक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेच्या उत्पन्नात मोठा वाटा मालवाहतुकीचा आहे. रेल्वे मंत्रालयाने आपले उत्पन्न अाणखी वाढवण्यासाठी मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले अाहे. या हेतूने देशातील २१ बंदरे रेल्वेने जोडण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. बंदरांच्या अखेरच्या भागापर्यंत रेल्वे जाणार आहे, यातून देशातील माल वाहतुकीस मोठी गती व चालना मिळणार आहे. सागरमाला या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे व बंदरे जोडली जातील. यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
देशांतर्गत मालाची वाहतूक जलद गतीने तसेच कमी खर्चात व्हावी यासाठी बंदरे रेल्वेद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. सागरमाला प्रकल्पातून हे काम हाेणार असून त्यासाठी रेल्वे व शिपिंग मंत्रालयाने एकत्र येऊन भारतीय पोर्ट रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) या कंपनीची स्थापना केली आहे. ‘अायपीआरसीएल’ने विशाखापट्टणम व चेन्नई ही बंदरे जाेडली अाहेत. उर्वरित १९ बंदरांना जोडण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. बंदरे एकमेकांना जोडली गेल्यानंतर दक्षिण भारतातील बंदराचा विकास जलद गतीने होण्यास मदत हाेईल. तसेच औष्णिक वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या काेळशाच्या वाहतुकीसही मदत हाेणार अाहे. बंदरे जोडल्यानंतर भारतीय बाजारपेठा अधिक स्पर्धात्मक बनतील. तसेच मालवाहतूक ही एक चळवळ बनेल. यामुळे मालवाहतूक कमी खर्चात व कमी वेळेत करणे शक्य हाेईल. तसेच सागरमाला प्रकल्पामुळे किनाऱ्यालगत असलेले प्रदेश संपर्कात येऊन त्यांचा विकास शक्य हाेईल.

दोन बंदरांच्या मार्गावर सोलापूर
चेन्नई येथील बंदरांवर ‘सागरमाला’अंतर्गत काम झाले आहे. लवकरच मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरावर कामास सुरुवात होईल. दोन्ही बंदरांवरून हाेणारी मालाची रेल्वे वाहतूक व्हाया साेलापूरमार्गे केली जाईल. सोलापूर रेल्वेस्थानक हे दोन्ही शहरांना व बंदरांना जोडले जाईल, अशी माहिती साेलापुरातील अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक मनिंदरसिंग उप्पल यांनी दिली.

बंदरांचा कायापालट
बंदरे रेल्वेद्वारे एकमेकांना जोडण्याचा बहुधा देशातील हा पहिलाच प्रयोग असेल. त्यामुळे बंदरे विकसित व अत्याधुनिक बनवली जातील. नवीन बंदरांची उभारणी केली जाईल तसेच सागरी किनाऱ्यांचा सामाजिक विकासदेखील केला जाणार आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...