आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा वीज विभागाची यंत्रणा ढासळतेय, शहरात अनेक ठिकाणी रात्री पथदिवे बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका विद्युत विभागाची यंत्रणा ढासळल्याची प्रचिती येत आहे. कारण शहराच्या अनेक भागांत रात्री पथदिवे बंद असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अपघात आणि चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
भय्या चौक ते जाम मिल, गांधीनगर ते महावीर चौकापर्यंत पथदिवे बंद आहेत. यामुळे या मार्गावर अंधार पसरला आहे. सिव्हिल चौक ते पोटफाडी चौकापर्यंत गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे बंद होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर बुधवारी हे पथदिवे सुरू करण्यात आले. गोंधळे वस्ती ते समाधाननगरपर्यंत काही ठिकाणी पथदिवे बंद तर काही ठिकाणी सुरू आहेत. या परिसरातील हा एकमेव रस्ता मोठा असल्यामुळे येथे वाहतूक जास्त आहे. पथदिवे बंद असल्यामुळे येथून जाणे अवघड आहे. कारण रस्त्याच्या मधल्या पट्ट्यात दोन्ही बाजूने खुले मैदान आहे. त्यामुळे चेन स्नॅचिंगचे प्रकार होण्याची शक्यता आहे. 
 

अक्कलकोट रस्तापरिसरातील गोंधळे वस्ती ते समाधाननगरपर्यंत रस्त्यावरील दिवे सारखे बंद असतात. जेव्हा आम्ही जाऊन तक्रार करतो. तेव्हा पथदिवे सुरू होतात. नंतर एका आठवड्यातच बंद पडतात. 
- दत्तात्रय कैरमकोंडा, नागरिक 
बातम्या आणखी आहेत...