आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांसाठी एसटीच्या विविध आकर्षक योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - "गावतेथे रस्ता, रस्ता तेथे एसटी', अशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाने "विशेष आकर्षक सुविधा' सुरू केल्या आहेत. एसटीच्या या सात विविध योजनांचा लाभ प्रवासी घेत असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
"वार्षिक सवलत कार्ड योजना', "संगणकीय आरक्षण इंटरनेट तिकिटांची सुविधा', "आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजना', "प्रासंगिक करार', "रात राणी फेऱ्यांच्या प्रवास भाड्यात १५ टक्के सूट', "वार्षिक सवलत कार्ड योजना त्रैमासिक पास योजनेत ५० दिवसांच्या भाड्यात ९० दिवस प्रवास', "मासिक पास योजनेमध्ये २० दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास', अशा "विशेष आकर्षक सुविधा' प्रवाशांसाठी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील प्रवासी महामंडळाच्या या विविध योजनांचा लाभ घेत असल्याचे प्रशासनाने सांगितले. यासोबतच "संगणकीय आरक्षण', "आगाऊ आरक्षणा'सह "इंटरनेट सुविधा'ही प्रवाशांना पुरवण्यात आली आहे. अकोला विभागात या सर्वच सुविधा उपलब्ध असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

प्रासंगिक करारावर मिळेल एसटी : विद्यार्थी,प्रवासी गट, सामूहिक सहल, लग्न प्रसंग इतर समारंभासाठी प्रासंगिक करारावर एसटी सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच आंतरराज्य सुविधेचा लाभही प्रवाशांना घेता येणार आहे. इतकेच नव्हे, तर प्रासंगिक करार केलेली एसटी १२ तासांच्या आत परत आल्यास शंभर किलोमीटरची सूट दिली जाते.

योजनेमध्ये माफक प्रवास भाडे
आवडेल तेथे प्रवास योजना ही राज्य आंतरराज्यात उपलब्ध आहे. कमी प्रवास भाड्यात प्रवाशांना चार सात दिवसांची पास दिली जाते. परीक्षा, तीर्थस्थळे, प्रेक्षणीय स्थळे व्यापारासाठी प्रवाशांना कोठेही प्रवास करता येतो. वार्षिक सवलत कार्ड योजनेत दोनच्या कार्डद्वारे प्रवास भाड्यात वर्षभर १० टक्के सवलत मिळते. यासोबतच एसटी अपघातात मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईव्यतिरिक्त दीड लाखांपर्यंत विमाचे संरक्षण कवच आहे.