आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटा बदलण्यासाठी रांगेत थांबून थकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्यांनी दिला दिलासा, ४५० विद्यार्थ्यांनी केली बँक ग्राहकांची सेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हजार,पाचशे रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी पडली. ज्येष्ठ नागरिक रांगेत उभारून थकले. बँक निरक्षर असलेल्यांची तारांबळ झाली. यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे ४५० विद्यार्थी त्यांच्या मदतीला धावले. विद्यार्थी दशेत सामाजिक भान आणि संवेदना यावी, सामाजिक समस्यांची जाणीव व्हावी यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला. यामुळे अनेक ग्राहकांना मदत झाली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

गरजू ग्राहकांना अर्ज भरून देणे, रांगेत बराच वेळ थांबल्याने थकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सावलीत बसवून त्यांच्याऐवजी स्वत: उभे राहणे, पासबुकवर जमा असलेली रक्कम सांगणे, काढणे भरण्याची प्रक्रिया समजावून सांगणे आदी प्रकारे विद्यार्थ्यांनी मदत केली. इयत्ता वी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने एक वेगळा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला
^मुलांनाशिक्षणदेता देता त्यांना व्यावहारिक जगाचेही ज्ञान देता आले पाहिजे, या हेतूने हा उपक्रम राबवला. विद्यार्थांनी खूप उत्साहाने यात सहभाग घेतला. त्यांना खूप आनंद झाला. बँकेत जाऊन पैसै काढण्यासाठी आणि भरण्यासाठी कसे कामकाज करायचे असते, याचे ज्ञान त्यांना घेता आले.'' सुनीताचपुत, मुख्याध्यापिका, ज्ञान प्रबोधिनी

कामी आल्याचा आनंद वाटला
आम्ही ज्या ज्या बँकांमध्ये फिरलो तिथे खूप वेळ काम केले. तिथे भल्या मोठ्या रांगा होत्या. तिथे जे अशिक्षित लोक होते त्यांना अंगठा लावून देणे, अर्ज भरणे, पासबुकवरील रकमेची माहिती सांगणे, रांगेत थांबून मदत करणे, त्यांना पाणी देणे अशी कामे केली. आपण कुणाच्या तरी कामी आलो याचा आनंद वाटला. प्रांजलीकुंटे, उपक्रमात सहभागी विद्यार्थिनी
बातम्या आणखी आहेत...